#कलमहाराष्ट्राचा - निवडणुका झाल्यास सर्वात मोठा विजयी पक्ष कोणता? Saam Tv
मुंबई/पुणे

#कलमहाराष्ट्राचा - प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक फायदा

महाविकास आघाडीच्या प्रशासनाबद्दल जनतेचं काय मत आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकाळ व साम टीव्हीतर्फे 'मूड महाराष्ट्राचा?' महाविकास आघाडीला राज्यात सत्तेवर येऊन दोन वर्षे झाल्यानंतर काय आहे आणि काय असे राजकीय स्थिती याबाबत महासर्वेक्षण करण्यात आलं आहे. 'कोण आहे जनतेच्या मनातला मुख्यमंत्री? २८८ मतदारसंघात आज निवडणूक झाल्यास काय चित्र असेल? महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक झाल्यास २८८ मतदारसंघ स्वतंत्र आणि विभागनिहाय कसे चित्र असेल? महाविकास आघाडीच्या प्रशासनाबद्दल जनतेचं काय मत आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा या महासर्वेक्षणातून घेण्यात आला आहे.

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारला येत्या २८ नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. भाजपकडून सरकार पडेल असा दावा वारंवार केला जातो, तर महाविकास आघाडीचे नेते सरकार पाच वर्ष चालेल, असं ठणकावून सांगतात. ठाकरे सरकारच्या द्विवर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ''सकाळ आणि साम''ने मिळून एक सर्व्हे केला. त्यामधून आलेले निकाल हे धक्कादायक आहेत.

आतापर्यंतच्या सर्व प्रश्नांना जो कौल महाराष्ट्रातील जनतेने दिला, तोच या प्रश्नावर कायम राहिला आहे. पक्ष म्हणून सारे स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे २७.९ टक्के जनाधार राहील; त्याखालोखाल शिवसेनेला २४ टक्के जनाधार राहील. त्यानंतर राष्ट्रवादी (२१.४ टक्के) आणि शेवटी काँग्रेस (१४.२ टक्के )असा कौल आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला २५.७५, शिवसेनेला १६.४१, राष्ट्रवादीला १६.७१ आणि काँग्रेसला १५.८७ टक्के मतदान झाले होते. जवळपास तोच क्रम आताही कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

Raj Thackarey News : हिंदुत्वाला तडा घालण्याचं काम शरद पवारांनी केलं; लालबागमधून राज ठाकरेंचा घणाघात|VIDEO

Kolhapur News : नाशिकनंतर कोल्हापुरात जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtrachi Hasya Jatra टीम झळकणार नवीन चित्रपटात, प्रसाद, सई, वनिताची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर, ‘गुलकंद चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT