Kalyan Political News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Political News: कल्याणमध्ये शिंदे गटातील इच्छुकांची यादी वाढली, भाजप आमदारांच्या कमानी शेजारीच शिंदे गटाच्या इच्छुकाचा बॅनर

Kalyan News: विधानसभा निवडणुकीत कल्याणमध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिंदे गटात जागेवरून वाद निर्माण होऊ शकतो.

Satish Kengar

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Latest Kalyan-Dombivli News in Marathi:

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून महायुतीतील मित्र पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. गणेशोत्सवाचे निमित्त साधून अनेक इच्छूकांनी विविध ठिकाणी कमानी आणि बॅनर उभारले आहे.

कल्याण पूर्वेतून शिवसेनेकडूुन इच्छूक असलेले माजी नगरसेवक विशाल पावशे यांचा पुन्हा असाच एक लक्षवेधी बॅनर झळकला आहे. यापूर्वीही पावशे यांनी यापूर्वी दोन खळबळजनक बॅनर लावले होते. त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले होते.

आता लावलेल्या बॅनरमध्ये पहिले नमन विकासाचे, दुसरे वंदन ट्रॅफिक मुक्तीचे, तिसरे मागणे चांगल्या रस्त्यांचे, चौथी इच्छा स्वच्छतेची, पाचवी आशा सुरक्षिततेची या गोष्टीवर भर देत हवी फक्त तुमची साथ आणि माया, अशी साद या बॅनरच्या माध्यमातून घालण्यात आली आहे. हा बॅनर पावशे यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कमानी शेजारीच लावला असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

कल्याण पूर्वेतील भाजप आमदार हे तीन वेळा निवडून आलेले आमदार आहे. कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड हे सध्या तळोजा तुरुंगात आहेत.

विधानसभा निवडणूकीत कल्याण पूर्वेतून शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी महेश गायकवाड, निलेश शिंदे, विशाल पावशे हे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. यातच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT