Sitaram Yechury: ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Veteran CPM lLader Sitaram Yechury Passes Away: ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे.
ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sitaram YechurySaam Tv
Published On

CPI(M) General Secretary Sitaram Yechury passes away at 72: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे गुरुवारी निधन झालं. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांना नुकतेच एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, सीताराम येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांना आयसीयूमध्ये नेण्यात आलं. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली. यानंतर आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ST Bus: लालपरीला बाप्पा पावला! तब्बल ९ वर्षांनी ST ला अच्छे दिन; पहिल्यांदाच झाला 'इतक्या' कोटींचा नफा

कोण होते ताराम येचुरी?

सीताराम येचुरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस आणि पक्षाच्या संसदीय गटाचे नेते आहेत. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई येथे तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना 2016 मध्ये राज्यसभेत सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात जेएनयूमध्ये असताना त्यांना अटक करण्यात आली होती.

यानंतर ते सलग तीन वेळा जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1984 मध्ये त्यांना सीपीआयच्या (एम) केंद्रीय समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. 2015 मध्ये त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली.

ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bhagyashri Atram: भाग्यश्री आत्राम यांनी तुतारी फुंकताच वडिलांवर केला हल्लाबोल, धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात लढवणार निवडणूक?

येचुरी हे 2005 मध्ये पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून आले होते. त्यांनी सभागृहात अनेक मुद्दे उपस्थित केले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. नुकतीच येचुरी यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता त्यांना फुफ्फुसाच्या संसर्गामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com