Police intervene after violent clashes erupt between BJP and Shinde Sena workers in Dombivli during KDMC election campaigning. Saam Tv
मुंबई/पुणे

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

Mahayuti Violence Dombivli: डोंबिवलीत भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय... मात्र केडीएमसीत युतीत असणाऱ्या या मित्रपक्षांमध्ये रस्त्यावर राडा का झाला? केडीएमसीतील या राड्यात नेमकं काय घडलं?

Suprim Maskar

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता रक्तरंजित वळण लागलयं... डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगरमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय... या राड्यात भाजप उमेदवाराच्या पतीवर कोयत्यानं हल्ला झाल्याचा आरोप असून दोन्ही बाजूचे 4 जण गंभीररित्या जखमी झालेत... त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत...

डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप- शिंदेसेनेत युती नसल्यानं दोन्ही पक्ष आमनेसामने आले... 11 जानेवारीला शिंदेसेनेनं भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप करत चार जणांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं... त्यानंतर ठोस कारवाई न झाल्यानं 12 जानेवारीला शिंदेसेना आक्रमक झाली... त्यानंतरच भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली....

कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिंदेसेनेतील हा वाद नवा नाही... राज्याच्या राजकारणात हे दोन्ही मित्रपक्ष असले तरी डोंबिवलीत वर्चस्वाच्या लढाईत अनेकदा दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडलीय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात शहरातील विकासकामाच्या श्रेयवादावरून अनेकदा शीतयुद्ध रंगलयं...अशातच प्रभाग क्रमांक 29 मध्ये झालेल्या राड्यानं कल्याण-डोंबिवलीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय... निकालानंतर हा वाद नेमकी कुठली परिसीमा गाठतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT