Mumbai political leaders from BJP and Shinde Sena in a tense discussion following municipal election controversy. Saam Tv
मुंबई/पुणे

भाजप-शिंदेसेनेत संघर्ष पेटला? सरवणकरांचा आरोप, व्हॉटसअ‍ॅप मेसेजमुळे पराभव

BJP Shinde Sena Clash Mumbai Municipal Elections: मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आणि शिंदेसेनेत अंतर्गत वाद पेटले आहेत. समाधान सरवणकरांच्या आरोपांमुळे महायुतीतील राजकारण तापलं असून, अमित साटम चौकशीसाठी पुढाकार घेत आहेत.

Suprim Maskar

मुंबईत महायुतीतच वादाची ठिणगी पडलीय... शिंदेसेनेचे नेते समाधान सरवणकरांनी माहिममधील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ माजलीय... त्यामुळे मुंबईत पराभवानंतर कसं राजकारण तापलयं?

मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यायत.व्हॉटसअॅपच्या माध्यमातून निवडणुकीत शिंदेसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपची एक टोळी सक्रीय असल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी केलाय... त्यामुळे सरवणकरांच्या आरोपावर ठाकरेसेनेचे आमदार महेश सावंत आणि भाजप नेते संतोष धुरी यांनी खोचक टीका केलीय...

दुसरीकडे या आरोपांनंतर सरवणकर खोटी माहिती पसरवत असल्याचा आणि अपयशाचं खापर मित्र पक्षांवर फोडत असल्याचा हल्लाबोल भाजप महामंत्री अक्षता तेंडुलकरांनी केलाय... तर तेंडुलकरांना मिरची का झोंबली, अशी टीका करत समाधान सरवणकरांनी थेट काही व्हॉट्सअप चॅटच जारी केलेत...

दरम्यान सरवणकरांच्या आरोपांमुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सरवणकरांच्या आरोपांची चौकशी करणार असल्याचं सांगितलयं...मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून आधीच भाजप आणि शिंदेसेनेत अंतर्गत धुसफुस आहे... अशातच दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये निवडणुकीतील असहकार्यावरून वाद निर्माण झाल्यानं मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेनंतर या वादाचा नेमका काय परिणाम होतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT