Mumbai Congress Protest Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Congress Protest: 'आम्ही घाबरत नाही', ‘रावण’ वादावरून वर्षा गायकवाड यांचा भाजपवर हल्लाबोल

Varsha Gaikwad News: 'आम्ही घाबरत नाही', ‘रावण’ वादावरून वर्षा गायकवाड यांचा भाजपवर हल्लाबोल

Satish Kengar

Mumbai Congress Protest:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रावणाच्या अवतारात दाखवणारं पोस्टर भाजपच्या आयटी सेलने प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे पडसाद मुंबईत उमटले. भाजपने केलेल्या या टीकेला उत्तर देण्यासाठी मुंबई प्रदेश काँग्रेसने निषेध आंदोलन पुकारलं. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही सहभागी झाले होते.

याच मुद्द्यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ''राहुल गांधी सातत्याने महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर भाजपवर टीका करत आहेत. ही टीका झोंबल्यानेच भाजपने आता राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका केली आहे. आम्ही, मुंबई काँग्रेसतर्फे याचा निषेध करतो.'' आम्ही घाबरत नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

त्या म्हणाल्या, महागाई, बेरोजगारी, द्वेष, तिरस्कार, जातीयवाद, जुमलेबाजी, सांप्रदायिकता, मित्र-परिवारवाद, हा आजच्या जमान्यातला रावण आहे. २०२४ मध्ये राहुल गांधी याच रावणाचं दहन करणार आहेत आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आमचा खारीचा वाटा उचलणार आहेत. (Latest Marathi News)

याचबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारतात महिलांवर अत्याचार करणारा पक्ष म्हणजे भाजप. हे लोक दर दिवशी सीतेचं शीलहरण करतात, पण भाजपचे नेते, खासदार, आमदार सगळेच जण डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहेत.

ते म्हणाले, यांच्या विरोधात आमचे नेते राहुल गांधी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहेत. लोकांना भेटत आहेत. याचीच भीती आता भाजपने घेतली आहे. खरा रावण कोण आहे ते जनता ओळखते आणि आता या रावणाचे दिवस भरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT