मारण्याची, शिवी देण्याची परवानगी तुम्ही दिली का? कदमांचा CM ठाकरेंना सवाल
मारण्याची, शिवी देण्याची परवानगी तुम्ही दिली का? कदमांचा CM ठाकरेंना सवाल Saam Tv
मुंबई/पुणे

मारण्याची, शिवी देण्याची परवानगी तुम्ही दिली का? कदमांचा CM ठाकरेंना सवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पंतप्रधान मोदींविषयी एका वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) नव्या वादाची ठिणगी पडली आहे. पटोलेंचा, 'मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो,' असं विधान असलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आता भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी नाना पटोले यांच्यावर FIR नोंद करण्याची मागणी केली आहे. (Ram Kadam On Nana Patole's Controversial Statement Against PM Narendra Modi)

त्यांनी याविषयी म्हणलं, "नाना पटोले यांची जागा लोकांमध्ये नसून तुरुंगात गजाआड आहे. आमची ठाकरे सरकारकडे मागणी आहे त्यांनी ताबडतोब एफआयआर घ्यावा. एफआयआर घेतला नाही तर मोदींवर प्रेम करणारे लोक रस्त्यावर उतरतील. ठाकरे सरकारला आमचा सवाल आहे काँग्रेस प्रांत अध्यक्षांना तुम्ही काय परवानगी दिली आहे का? की ते कोणालाही मारू शकतात शिव्या देऊ शकतात" असा सवाल राम कदम यांनी केला आहे. (Political News In marathi)

नेमकं काय आहे प्रकरण;

नाना पटोलेंचा जो व्हीडिओ व्हायरल होतोय, त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलंय-

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नरेंद्र मोदींबद्दल बोलताना जीभ घसरली होती. "मी नरेंद्र मोदी यांना शिव्या देऊ शकतो आणि मारूही शकतो असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होत. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे प्रचार सभे दरम्यान काही नागरिकांनी आपल्या समस्या नाना पटोलेंसमोर (Nana Patole) मांडल्या यावेळी पटोले कार्यकरत्यांना म्हणाले होते. आता आपली ताकद वाढली असून, ‘आपण पंतप्रधान मोदी यांना मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं ते यावेळी म्हणाले होते.

हे देखील पहा-

मात्र, राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी (State President) देशाच्या पंतप्रधानानबद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य करणं कितपत योग्य आहे. असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून पटोले हे त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत आले असून त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान देशामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहेत. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी गॅस सिलिंडर दिले व आता पुढील काळात ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे तो सधन घोषित करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे वक्तव्यही नाना पटोले (Nana Patole) यांनी केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT