Nikhil Wagle Saam tv
मुंबई/पुणे

Nikhil Wagle : पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, निखिल वागळेंची कार फोडली

Nikhil Wagle News : भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर शाईफेक आणि वाहन फोडण्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

Pune Latest News :

पुण्यात 'निर्भय बनो'च्या कार्यक्रमावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. सभा उधळण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची कार अडविण्याची घटना समोर आली आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर शाईफेक आणि वाहन फोडण्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. (Latest marathi News)

'निर्भय बनो'च्या सभेस जाण्यास निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे यांची कार अडविण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. पुण्यातील खंडोजी बाबा चौक येथे ही संपूर्ण घटना घडली. निखिल वागळे यांच्या कारवर अंडी आणि दगड फेकण्यात आले आहेत, अशी माहिती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने

'निर्भय बनो'च्या सभेवरून पुण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याची घटना घडली. भररस्त्यात झालेल्या गोंधळामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. या सभेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर रस्त्यातच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपमुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

'निर्भया बनो'च्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, ' महायुती सरकार ही फुले, शाहू, आंबेडकरांना आणि लोकशाहीला मानणारी सरकार आहे. या सरकारमध्ये कोणावरही झालेला हल्ला अजिबात खपवून घेतला जाणार नाही.

'ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ला संदर्भात मी लगेच पुण्याची पोलीस आयुक्तांशी बोलून दोषींवर कारवाई करायला लावणार आहे, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

SCROLL FOR NEXT