solapur news Saam tv
मुंबई/पुणे

ऐन निवडणुकीत मोठा राडा; नाराज कार्यकर्त्यांनी भाजपचं कार्यालय फोडलं, VIDEO

Solapur political news : सोलापुरात ऐन निवडणुकीत मोठा राडा झाल्याची घटना घडली. उमेदवार न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांनी भाजपचं कार्यालय फोडल्याची घटना समोर आली आहे.

Vishal Gangurde

ऐन निवडणुकीत सोलापुरात मोठा राडा

सोलापुरात भाजप कार्यालय फोडलं

पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

ऐन निवडणुकीत सोलापुरात मोठा राडा झाला आहे. सोलापुरात राजकीय वादातून दोन गटात वाद झाला. सोलापुरात भाजपच्या माजी नगरसेवकाचं संपर्क कार्यालय फोडल्याची घटना समोर आली आहे. या तोडफोडीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.v

सोलापुरातील जोशी गल्लीतील भाजपचं कार्यालय फोडल्यानंतर नागरिकांची एकच धावाधाव झाली. काहींनी तोडफोडीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी पांगवली. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटात झालेल्या वादातून माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचं संपर्क कार्यालय फोडण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

उमेदवारी न मिळाल्याच्या करणावरून दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर एका नाराज गटाने शिंदे यांचं कार्यालय फोडलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी तातडीने कार्यालय फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर परिसरातील तणाव निवळला.

नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

नाशिकमध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. भाजप अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि देवानंद बिरारी आणि पत्नी वंदना बिरारी यांच्यात वाद झाला. किरकोळ कारणावरून बाळा शिरसाट आणि देवानंद बिरारी यांच्यामध्ये हाणामारी झाली.

नाशिकच्या सिडको महापालिका कार्यालयात वाद झाला. नाशिकच्या प्रभाग 31 मधून वंदना बिरारी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र भाजपाने बाळा शिरसाठ यांना उमेदवारी दिली आहे. आज शुक्रवारी वंदना बिरारी आणि पती देवानंद बिरारी माघार घेण्यासाठी आले असताना हाणामारीची घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर महापालिकेतील नगरसेवकांची २७ जानेवारीला गटनोंंदणी होणार

Chanakya Niti: कोणत्या गोष्टींचा जास्त मोह ठेवू नये? जाणून घ्या जीवनाचं कडू सत्य

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

SCROLL FOR NEXT