BJP Malegaon Blast Case Kashmir Files x
मुंबई/पुणे

BJP : काश्मीर फाईल्ससारखा 'मालेगाव फाईल्स' सिनेमा झाला पाहिजे, भाजप खासदाराची मागणी

Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांचे पुण्यात स्वागत करण्यात आले. स्वागताच्या शोभायात्रेला भाजप खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.

Yash Shirke

  • काश्मीर फाईल्ससारखा मालेगाव फाइल्स सिनेमा व्हावा

  • भाजप महिला खासदार मेधा कुलकर्णींची मागणी

  • पुण्यात केलेल्या वक्तव्याची होतेय चर्चा

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : काश्मीर फाईल्ससारखा मालेगाव फाईल्स हा सिनेमाही झाला पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी एक असलेले कर्नल प्रसाद पुरोहित यांचे पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभाला मेधा कुलकर्णी हजर होत्या. त्यावेळी कुलकर्णी यांनी हे वक्तव्य केले.

कर्नल प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आज पुण्यात प्रसाद पुरोहित यांच्या घरी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कर्नल पुरोहित यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी कर्नल प्रसाद पुरोहित यांचे स्वागत केले, अभिनंदन केले.

'काश्मीर फाईल्सप्रमाणे मालेगाव फाईल्स हा सिनेमा काढावा. काँग्रेसने त्यांच्या काळात फेक नरेटीव्ह पसरवले होते. त्यांचे पितळ उघडं पाडण्यासाठी मालेगाव फाईल्स हा सिनेमा आलाच पाहिजे' अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. यावेळी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

३१ ऑगस्ट रोजी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला. या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी या सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. तब्बल १७ वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आयफोन १७ घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी

Gold Price Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ! ग्राहकांच्या खिशाला फटका, वाचा २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत

The Bads Of Bollywood Review: किंग खानच्या मुलाची 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' वेब सिरीज पास की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

Teachers Recruitment: सुवर्णसंधी! राज्यात ६२०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भरती, अर्ज करण्याची मुदत काय?

Pitru Paksha Rituals: पितृपक्षात वाढदिवस साजरा करावा का? शास्त्र काय सांगते

SCROLL FOR NEXT