रस्त्याच्या राजकारणात आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांची उडी
रस्त्याच्या राजकारणात आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांची उडी प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

रस्त्याच्या राजकारणात आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांची उडी

प्रदीप भणगे

कल्याण - एमएमआरडीएने MIDC मंजूर केलेले ३६० कोटी रस्त्याच्या राजकारणात आता भाजप आमदार गणपत गायकवाड Ganpat Gaikwad यांनी सुद्धा उडी मारली आहे.एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते कुठल्या सालचे आहेत, त्याची माहिती काढा. ३६० कोटी मंजूर झाले आहेत. पण त्याच्या नुसत्या मंजुऱ्या येतात, त्याचे होर्डिंग लागतात, पण काम कधी सुरू होणार? याला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेने डोंबिवलीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा करत मनसे आणि भाजप आमदारांवर टीका केली.त्यानंतर आता यात कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उडी मारत सत्ताधारी यांच्यावर टीका केली आहे.

हे देखील पहा -

कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मोफत लसीकरण शिबीर सुरू केले आहे. यामध्ये अंध व्यक्ती, दिव्याग व्यक्ती, घरेलू काम करणाऱ्या महिलांना प्रथम प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे आमदार गायकवाड यांनी आपल्या मूलाचे लग्न साधे करून तो लग्नाचा पैसा जनतेच्या लसीकरणासाठी वापरला आहे.

पुढील 3 दिवस लसीकरण सुरू असणार असून यामध्ये कल्याण पूर्वेतील शिक्षक ,रिक्षा चालक, पत्रकार आणि गोरगरीब जनतेलाही लस देणार आहोत असे त्यांनी संगितले आहे.लसीकरण वेळी आमदारांसोबत माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, मनोज राय, संजय मोरे उपस्थित होते. यावेळी 360 कोटीच्या रस्त्याच्या निधीवर त्यांनी प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्याना टोला हाणला आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की आपण जर बघितले असेल तर, माझी जुनी काम होती.त्याच जुन्या कामांनाच नवीन नाव देऊन नवीन निधी मंजूर केला असं दाखवण्यात आले आहे. खरतर कल्याण पूर्व मध्ये जो निधी आणला आहे, तो खूप कमी आहे. खरंतर १२३ कोटींचा निधी मी आधीच मंजूर करून आणला होता. त्या रस्त्याच्या कामाला नवीन नाव देऊन नवीन मंजुऱ्या आणल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : बारामतीत आज प्रचारसभांचा धुरळा उडणार, शरद पवार, अजित पवार जंगी सभा घेणार

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी सँडविच घरच्या घरी

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT