संचार बंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध; आंदोलन करण्याचा निर्धार

या बैठकीमध्ये तीन दिवस जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संचार बंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध; आंदोलन करण्याचा निर्धार
संचार बंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध; आंदोलन करण्याचा निर्धारभारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर - पंढरपूरसह Pandharpur सोलापूर Solapur जिल्ह्यातील माढा,करमाळा, माळशिरस,सांगोला Sangli या पाच तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने १३ ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पंढरपूर व्यापारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात भाजपचे BJP आमदार प्रशांत परिचारक Prashant Paricharak यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर व्यापारी महासंघाची बैठक झाली. या बैठकीमध्ये तीन दिवस जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे देखील पहा -

उद्या सकाळी छत्रपती शिवाजी चौकामध्ये घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. ११ ऑगस्ट रोजी व्यापारी महासंघाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे. १२ ऑगस्ट रोजी येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३ ऑगस्ट रोजी पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी आपली दुकाने उघडी ठेवणार आहेत.

संचार बंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध; आंदोलन करण्याचा निर्धार
पुण्यात परत मुळशी पॅटर्न; उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार

मागील काही दिवसांपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच सातत्याने दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता 13 ऑगस्ट पासून पंढरपूर 5 तालुक्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे आता व्यापारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com