पुण्यात परत मुळशी पॅटर्न; उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार

पूर्ववैमनस्यामधून निलेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी पाठालाग करत, दुसर्‍या गुंडाच्या कारवर गोळीबार करुन त्याला जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यात परत मुळशी पॅटर्न; उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार
पुण्यात परत मुळशी पॅटर्न; उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरारसागर आव्हाड

पुणे : पूर्ववैमनस्यामधून निलेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी पाठालाग करत, दुसर्‍या गुंडाच्या कारवर गोळीबार Firing करुन त्याला जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शिवणे Shivne याठिकाणी जवळच असलेल्या स्मशानभूमी Cemetery ते एनडीए रोड NDA Road दरम्यान रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा थरार भर रस्त्यावर रंगला आहे.

याप्रकरणी केदार शहाजी भालशंकर (वय- २४) रा. रामनगर, वारजे याच्या पाठीत गोळ्या मारून त्याला तो जखमी करण्यात आले आहे. भालशंकर याच्या फिर्यादीवरुन उत्तमनगर Uttamnagar पोलिसांनी Police निलेश गायकवाड आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, केदार भालशंकर आणि त्याचे मित्र हर्षवर्धन मोहिते व आकाश शिंदे हे कारमधून रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घरी जात होते.

हे देखील पहा-

केदार भालशंकर हा गाडी चालवत होता. त्यावेळेस शिवणे हे स्मशानभूमी ते एनडीए रोड दरम्यान निलेश गायकवाड आणि त्याचे ३ ते ४ साथीदार ३ दुचाकीवरुन आले. त्यांनी भालशंकर याच्या गाडीचा पाठलाग करत त्यांच्यावर फायरिंग केलेली आहे. एका पाठोपाठ एक अशा ६ गोळ्या त्यांच्यावर झाडल्या आहेत. त्यातील एक गोळी कारच्या मागील बाजूच्या काचेतून आर- पार शिरली आहे.

पुण्यात परत मुळशी पॅटर्न; उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार
नीरेत मुळशी पॅटर्नचा थरारक, कुख्यात गुंड गणेश रासकरची भर चौकात हत्या

भालशंकर याच्या पाठीत ती गोळी घुसली आहे. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. शिवणे स्मशानभूमी ते एनडीए रोड दरम्यान हा पाठलाग कर्णयुगात आला आहे. यावेळी रस्त्याने जाणार्‍या- येणार्‍या लोकांना या टोळक्याने पळवून लावून दहशत निर्माण केलेली होती. या घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

उत्तमनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडवी खुर्द Mandvi Khurd याठिकाणी सरपंदाच्या निवडणुकीमध्ये election बिनविरोध निवडून येण्यासाठी धमकाविल्याच्या प्रकरणामुळे उत्तमनगर पोलिसांनी जानेवारीमध्ये गुन्हा दाखल करुन, काहीना अटक Arrested करण्यात आली होती़ त्यात केदार भालशंकर हाही एक आरोपीचा समावेश होता.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com