Ganpat Gaikwad Health Saam TV
मुंबई/पुणे

Ganpat Gaikwad Health: गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात जेवण सोडलं; गेल्या २ दिवसांपासून अन्न त्याग

Ganpat Gaikwad Not Eating Food: त्यामुळे तज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड आणि नागेश बढेकर अद्याप फरार आहेत.

Ruchika Jadhav

BJP MLA Ganpat Gaikwad:

उल्हासनगर पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते कळवा पोलीस ठाण्यात अटकेत आहेत. अशात गेल्या २ दिवसांपासून ते जेवत नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसंपासून आमदार गणपत गायकवाड यांनी जेवण केलेलं नाही. त्यामुळे तज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड आणि नागेश बढेकर अद्याप फरार आहेत.

पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू असून लवकरच पोलीस त्यांना ताब्यात घेतील अशी शक्यात आहे. या प्रकरणात तपासासाठी ठाणे जिल्ह्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहा टीम कार्यरत आहेत.

आमदार गणपत गायकवाड गोळीबारप्रकरणी पोलीसही अडचणीत

शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळाबारप्रकरणी आता हिललाइन पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे.

  • पोलीस ठाण्याच्या आवारातील राजकीय परिस्थिती हाताळण्यात हिललाइन पोलीस कुठे कमी पडले?

  • दोन्ही गटांचे समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात कसे आले?

  • अधिकाऱ्यांना राजकीय परिस्थितीचा अंदाज का घेता आला नाही?

  • महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड हे दोघेही एकाच दालनात असताना तेथे पोलीस अधिकारी का नव्हते?

  • पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचे फुटेज इतक्या तातडीने माध्यमांमध्ये प्रसारित कसे झाले?

गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारावर विरोधकांनी असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात उपस्थित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra Bus Accident : अमर यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

SCROLL FOR NEXT