PM Narendra Mod Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai BJP, PM Modi: 'मुंबई उपनगर'मध्ये PM मोदींच्या नावे भाजपचा '११ कलमी कार्यक्रम'

Mumbai BJP, PM Modi: लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपनेही महाराष्ट्रात नमो-११ सूत्री कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai BJP, PM Modi

लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपनेही महाराष्ट्रात नमो-११ सूत्री कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महिला, शेतकरी आणि असंघटीत मजुरांच्या सक्षमिकरणाच्या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून ४० हजार गावांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा मानस आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, चांदिवली, अंधेरी (पश्चिम), वांद्रे (पश्चिम), घाटकोपर (पूर्व), वांद्रे (पूर्व), मागाठणे, मुलुंड, मालाड, कांदिवली, विलेपार्ले या ठिकाणी सदर उपक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई उपनगर जिल्ह्यात राबवले जाणारे उपक्रम

१. कुर्ला येथे नमो महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिलांना रोजगार आणि तांत्रिक शिक्षण प्रदान केले जाईल. याद्वारे महिलांना Airline Customer Service Executive आणि Account executive पदासाठी आवश्यक प्रशिक्षण मिळणार आहे.

२. नमो कामगार कल्याण अभियानांतर्गत चांदिवली येथे मुंबई उपनगर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवण्यात येईल.

३. मत्स्य व्यवसायासारख्या कृषी संलग्न व्यवसायात कार्यरत असलेल्या मच्छीमार बांधवांचे उत्पन्न दुपटीने वाढावे, याकरिता अंधेरी (पश्चिम) येथे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिलांना शीत पेट्यांचे वाटप करण्यात येईल.

४. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानाअंतर्गत खार (पश्चिम) येथे मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिला बचतगटांमार्फत उत्पादित ऑरगॅनिक उत्पादनांच्या विशेष बाजारपेठेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

५. दलित वस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नमो दलित सन्मान अभियानांतर्गत घाटकोपर पूर्व येथे समाज मंदिर उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन

६. नमो ग्राम सचिवालय अभियानांतर्गत पूर्णपणे सौर उर्जेचा वापर होईल, यासाठी नियोजन करण्याकरिता वांद्रे (पूर्व) येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर स्थापित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

७. वंचित घटकांना प्रगत व आधुनिक शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानांतर्गत मागाठणे येथील आदिवासी बहुल शाळेतील सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन

८. नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत मुलूंड येथे मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांगांना इलेक्ट्रिक स्कुटरचे वाटप करण्यात येणार आहे.

९. नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियानांतर्गत अंबोजवाडी, मालवणी, मालाड (पश्चिम) येथे क्रिडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन

१०. नमो शहर सौंदर्यीकरण अभियानांतर्गत कांदिवली (पूर्व) येथील मैदानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन

११. पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यासाठी नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत विलेपार्ले येथील पार्लेश्वर मंदिराच्या परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT