BJP leaders mistakenly chant anti-government slogans during a protest in Pimpri Chinchwad, triggering a viral political moment. saam tv
मुंबई/पुणे

'या' सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय! महायुतीच्या नेत्यांनीच दिल्या घोषणा, VIDEO व्हायरल

BJP Leaders Chanting Against Own Government Viral Video: पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलनादरम्यान भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून चुकून स्वतःच्या सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Omkar Sonawane

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पिंपरी चिंचवड: राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, पिंपरी चिंचवडमध्ये आज जे घडलं ते पाहून साक्षात भाजपचे नेतेही कपाळावर हात मारून घेत आहेत. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरली खरी, पण उत्साहाच्या भरात त्यांनी चक्क स्वतःच्याच सरकारविरुद्ध घोषणाबाजी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांना धारेवर धरण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विधान परिषद आमदार उमा खापरे, माजी महापौर आणि आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. या निदर्शना दरम्यान भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. मात्र याचवेळी ते गोंधळले की काय असा प्रश्न पडला.

घोषणाबाजी सुरू असताना शितोळे यांनी जोरात घोषणा दिली. या सरकारचे करायचं काय? त्यावर आमदार उमा खापरे, महापौर रवी लांडगे आणि उपस्थित नगरसेवकांनी मागचा पुढचा विचार न करता सुरात सुर मिळवला. खाली डोकं वर पाय! प्रशांत शितोळे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा घोषणा दिली. NDA सरकारचं करायचं काय? पण उपस्थित पदाधिकारी इतके फॉर्ममध्ये होते की त्यांनी पुन्हा एकदा जोरात उत्तर दिले खाली डोकं वर पाय!

आपण काँग्रेस विरोधात नाही तर चक्क केंद्र आणि राज्यातील स्वतःच्याच सरकारविरोधात घोषणा देतोय हे लक्षात आल्यावर सर्वांचीच धावपळ उडाली. अखेर आमदार उमा खापरे यांनी प्रसंगावधान राखत हात जोडले आणि NDA आघाडीचा विजय असो अशी घोषणा देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

Laptop : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? एकही रुपया खर्च न करता 'असा' वाढवा झटपट स्पीड

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

SCROLL FOR NEXT