Dombivali BJP Nandu Parab on Raj Thackeray साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

Raj Thackeray : भाजपच्या बड्या नेत्याकडून राज ठाकरेंचा अपमान, वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापणार

Raj Thackeray, Nandu Parab : कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

Dombivali BJP Nandu Parab on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात नंदू परब यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत उत्तर भारतीय वक्तव्याचा संदर्भ दिल्याने मनसे आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.

हिंदी भाषिक समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या भूमिकेचे समर्थन करताना परब म्हणाले, "ब्रिजभूषण सिंह यांना मी सलाम ठोकतो. त्यांनी केवळ एक धक्का दिला आणि 'उत्तर प्रदेशात येऊन दाखवा' असे आव्हान दिले, तर राज ठाकरे तिथे गेलेच नाहीत. उत्तर भारतीय माणसाने आपली ताकद दाखवून दिली," असा दावा परब यांनी केला. तसेच, "गरिबांना तर कोणीही मारू शकतो," अशा आशयाचे वक्तव्यही त्यांनी या वेळी केले.

हिंदी भाषिक समाजाच्या मंचावरून भाजपच्या जबाबदार जिल्हाध्यक्षाने राज ठाकरेंबाबत असा एकेरी उल्लेख आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्रातील 'मराठी विरुद्ध उत्तर भारतीय' या वादाच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, यावर मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप-मनसे वाद पेटला; मनसेचे हर्षद पाटील आक्रमक

कल्याण-डोंबिवली शहरात भाजप आणि मनसेमधील राजकीय वाद आता टोकाला पोहोचला आहे. उत्तर प्रदेशचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या भूमिकेच्या समर्थनावरून दोन्ही पक्षांचे नेते आमनेसामने आले आहेत. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर अत्यंत शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली आहे. "अनधिकृत बांधकामांसाठी उत्तर भारतीयांची हुजरेगिरी करणाऱ्यांनी आणि स्वतः शहरात सुरक्षित न फिरता टोळ्या घेऊन फिरणाऱ्यांनी राज साहेबांचे नाव घेऊ नये," असा सज्जड इशारा हर्षद पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT