Legislative Council Saam TV
मुंबई/पुणे

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरु, 'ही' नावे चर्चेत

भाजपमध्ये तर आतापासूनच इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली असून, याची यादी बरीच मोठी आहे.

Pravin

सुशांत सावंत

मुंबई: राज्यसभेसाठी सध्या सर्वच पक्षाची धावपळ सुरू झाली असताना आता विधान परिषदेसाठी देखील इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपमध्ये तर आतापासूनच इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली असून, याची यादी बरीच मोठी आहे. विधान परिषदेवर भाजपचे चार जण सहज निवडून जाणार असल्याने या चार जागासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहेत.

कुणाला मिळु शकते पुन्हा संधी?

विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपमध्ये बऱ्याच जणांची लॉबिंग सुरू असून, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा संधी मिळू शकते तर प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांच्यापैकी कुणाला तरी एकाला पुन्हा विधान परिषदेची संधी मिळू शकते.

हे नेते देखील इच्छुक

एकीकडे प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, अनिल बोंडे, राम शिंदे, कृपाशंकर सिंग यांचीही नावे चर्चेत आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे विनायक मेटे, सुरजित सिंह ठाकूर यांना विधान परिषदेत संधी मिळणार नाही अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. विधान परिषदेवर निवडणूक यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहे. त्यामुळे भाजपच्या सहज चार जागा निवडून येऊ शकतात.

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकांचे वारे आहे. सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडत आहे. भाजपचे दोन, राष्ट्रवादी एक, काँग्रेस एक असे पाच उमेदवार फिक्स राज्यसभेवर निवडणून जाऊ शकतात. प्रश्न आहे सहाव्या जागेचा सहाव्या जागेसाठी शिवसेनेची तयारी सुरु झाली आहे. शिवसेना सहावी जागा लढणार आहे. जर छत्रपती संभाजी राजेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर त्यांना सहावी जागा देऊ असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजेंसमोर काही अटी ठेवल्या आहेत.

विधान परिषदेच्या 10 जागांचा कार्यकाळ येत्या जूनमध्ये संपत असून, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुरजीतसिंह ठाकुर, विनायक मेटे, प्रसाद लाड, संजय दौंड, रामराजे निंबाळकर, रवींद्र फाटक या दहा जागा रिक्त होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Grooming Tips: आयब्रो करताना खूप वेदना होतात? मग आत्ताच फॉलो करा 'या' 7 टिप्स

Mega Block: पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार-रविवारी मेगा ब्लॉक; २५० लोकल रद्द; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी वाढले, २२ -२४ कॅरेटचा आजचा भाव किती?

Leopard Attack : आई- बाबांसोबत शेकोटी घेत होता; दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगद उचलून नेला; ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT