Mumbai: राणा दाम्पत्याच्या घरावर हातोडा पडणार?, माजी महापौरांचे मोठे विधान

शिवयोग केंद्राकरता तज्ञ प्रशिक्षकांचीच नेमणूक व्हावी ही माझी आग्रही भूमीका आहे.
Kishori Pednekar
Kishori PednekarSaam Tv
Published On

भूषण शिंदे

मुंबई: राणा दाम्पत्याच्या घरावर महापालिकेकडून (BMC) हातोडा पडण्याची शक्यता आहे. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. आता या प्रकरणावर माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची प्रतिक्रिया आली आहे. महापालिकेनं राणांना कळवलंय की नियमानुसार बांधकाम निष्कसित करावं, नाहीतर महापालिका प्रशासन कारवाई करेल असे पेडेणेकर म्हणाल्या आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut) आणि राणा दाम्पत्य लडाखला एका अभ्यास दौऱ्यादरम्यान एकत्र दिसले होते. त्यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या राणा खासदार आहेत, ते अभ्यासदौ-याकरता गेले होते. आम्हाला कुणाचा व्यक्तीश: राग नाही त्यांच्या कृतीचा राग आहे. संजय राऊत संपादक या पद्धतीनं अनेक गोष्टींकडे बघतात. लडाखचं अभ्यास दौ-याचं वातावरण आणि इथलं राजकिय वातावरण यांचा संबंध जोडणं चूकीचं आहे.

Kishori Pednekar
IPL 2022: मुंबईच्या हातात दोन बलाढ्य संघांचे नशिब, प्लेऑफमध्ये कोण जाणार?

शिवयोग केंद्राकरता तज्ञ प्रशिक्षकांचीच नेमणूक व्हावी ही माझी आग्रही भूमीका आहे. प्रशिक्षक पदाकरता किमान ५ ते १० वर्षांचा अनुभव असलाच पाहीजे, कुणीही येईल आणि प्रशिक्षक होईल असे चालणार नाही. प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं याकरता मी आयुक्तांना पत्र देत आहे असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

सामनाच्या अग्रलेखातून आज काँग्रेसवरती टीका करण्यात आली आहे. त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की मी पण सामनाचा अग्रलेख अजून वाचला नाहीये. आपण एकत्र सत्तेत काम करतोय याचं सगळ्यांनीच भान ठेवलं पाहीजे. काँग्रेस सातत्यानं महापालिकेत आरोप करतेय, त्याचंच उत्तर कदाचित राज्यात त्यांना मिळत असेल. सकारात्मक दृष्ट्या सूचना द्या मात्र आरोप-प्रत्यारोप नकोत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com