Girish Mahajan
Girish Mahajan  Saam TV
मुंबई/पुणे

Girish Mahajan: आमची खुर्ची फक्त काढू नका, शिवसेनेचं एवढंच धोरण, गिरीश महाजनांचा टोमणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: इतका निर्लज्जपणा मी कधीच पहिला नाही. नवाब मलिकांची खाती काढता मग राजीनामा का घेत नाहीत, असा सवाल भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीला केला आहे. तसेच, मग काम जेलमधूनच करा की, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. ते जेलमध्ये राहिले, तरी आम्ही त्यांना राजीनामा द्यायला लावणार नाही अशी यांची भूमिका आहे, असंही ते म्हणाले (BJP leader Girish Mahajan slams Shivsena over Nawab Malik case).

इतके वाईट दिवस शिवसेनेचे कधीही आलेली नाही - महाजन

शिवसेना (Shivsena) नवाब मलिक (Nawab Malik) जिंदाबाद म्हणत आहेत. इतके वाईट दिवस शिवसेनेचे कधीही आलेली नाही. आमची फक्त खुर्ची काढू नका, एवढं धोरण शिवसेनेचे आहे, असं म्हणत गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) शिवसेनेवर जोरदार टीका केलीये. तसेत, राज्यभरात शिवसेनेने फिरावं आणि लोक काय म्हणतात ते ऐकावं, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिलाय.

आज राज्यात विजेचा प्रश्न गंभीर आहे. राज्यात विदारक परिस्थिती आहे. सभागृह बंद पाडले तरी काहीच यांना देणे घेणे नाही, असा आरोपही त्यांनी केलाय.

हे भाई लोकांचे राज्य आहे - गिरीश महाजन

पोलिसांना गल्लीतल्या दादाकडे पैसे काढून घेण्यासाठी विनवण्या कराव्या लागत आहेत. हे भाई लोकांचे राज्य आहे. आता पोलिसांना भाई लोकांचे पाय धरावे लागत आहेत. जसा राजा तशी प्रजा. आता बदल्यांचे लिलाव सुरु आहेत. अधिकारी जेलमध्ये आहेत, असं महाजन नितीन नांदगांवकर (Nitin Nandgaonkar) प्रकरणावर बोलले.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

Amitabh Bachchan: कोस्टल रोड, अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट; भाजप अन् आदित्य ठाकरेंमध्ये रंगलं ट्विट वॉर

Investment Tips: गुंतवणूक करताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Waris Pathan : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ; वारीस पठाण निवडणुकीच्या रिंगणात, लढत तिरंगी होणार

Sambhajinagar News : शैक्षणिक वर्ष आटोपले तरीही शिष्यवृत्ती अर्जाचा तिढा कायम; १० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

SCROLL FOR NEXT