BJP/Shivsena
BJP/Shivsena Saam TV
मुंबई/पुणे

'भाजपच्या पोलखोलमुळे शिवसेनेचा डब्बा गुल झालाय'

जयश्री मोरे

मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजपकडून (BJP) पोलखोल अभियान रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या रथाची तोडफोड करण्यात आली होती. या संदर्भात भाजपने चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये (Chembur Police Station) तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणातील आरोपी पकडले नसल्याने आज पुन्हा भाजप नेत्यांकडून चेंबूर पोलीस ठाण्यांमध्ये आंदोलन करण्यात आलं.

यावेळी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवरती हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'भाजपच्या पोलखोलमुळे शिवसेनेचा डब्बा गुल झाला आहे. भारतीय जनता पक्ष जनतेच्या वतीने न्यायालयात जाऊन पोल-खोलच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षात विशेषतः गेल्या पाच वर्षात जो पैशाचा अपव्यय, अपहार, भ्रष्टाचार हा मुंबईकरांच्या पैशाचा केला आहे. याचा हिशोब नाही आणि त्याचीच याची पोलखोल करायला आम्ही रथयात्रा काढली होती.

तर त्या रथावर त्यावर दगडफेक करण्याचा मूर्खपणा करण्यात आला आहे. तसंच जर हिम्मत असेल तर समोर या, ज्यांनी चेंबुरमध्ये लपुन छपुन हल्ला केला त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी दोन आरोपी पकडले तीन आरोपी अजून पकडण्यासाठी पोलिसांनी सांगितलं आहे.

मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाला बघायचं आहे, आरोपींना पकडायला किती वेळ लागतोय, यामागे कोणी मास्टर माइंड आहे, कोण बोलवता धनी कोण आहे ? त्याची स्पष्टता झाली पाहिजे. आम्ही पोलिसांनी सहकार्य करु, पोलिसांनी CCTV बघीतलेत आम्ही त्यांना माहिती दिली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे. आम्ही त्यांच्याकडून कायदेशीर पावलाची अपेक्षा करत आहोत असही शेलार यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT