Rahul gandh i Saam tv
मुंबई/पुणे

Rahul Gandhi News :'राहुल गांधी सुधरा, नाहीतर इंदिरा गांधी करू'; कुणी दिली धमकी? पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खुलेआम जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. विशेष म्हणजे ही धमकी कुणी दहशतवादी आणि गुंडांनी नव्हे तर भाजपच्या माजी आमदारानं दिलीय. त्यामुळे दिल्लीतलं राजकारण चांगलंच तापलंय. राहुल गांधींच्या कोणत्या विधानामुळे हा माजी आमदार भडकलाय. आणि त्यानं नेमकं काय धमकी दिलीय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.,

Vinod Patil

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधींना खुलेआम जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपचे दिल्लीतील माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी उघडपणे राहूल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिलीय. राहुल गांधी वेळीच सावध व्हा नाहीतर तुमच्या आजीसारखीच तुमची गत होईल अशी असं खुलेआम धमकावलंय. त्य़ामुळे काँग्रेस आक्रमक झालीय. तरविंदर यांना पंतप्रधान मोदींचाच पाठिंबा असल्याचं आरोप काँग्रेसनं केलाय.

भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ' तुमची अवस्था तुमच्या आजीसारखी होईल, अशी धमकी माजी आमदार तरविंदर सिंग यांनी राहुल गांधी यांना दिली आहे.

राहुल गांधी यांना धमकी दिल्यानंतर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. 'मोदींचा पाठिंबा असल्याशिवाय असं बोलू शकत नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी टीका केली आहे.

राहुल गांधींनी अमेरिकच्या दौऱ्यात आपल्या भाषणात सरकारवर टीका करत असताना उदाहरण देताना शिखांबाबत विधान केलं. त्यामुळे वाद निर्माण झाला. राहुल गांधी नेमकं काय म्हटले ते पाहूयात. 'भारतात सध्या लढा सुरू आहे. तो एक शीख बांधवाला पगडी घालता येईल का? कडं घालता येईल का? किंवा गुरुद्वारेत जाता येईल का? केवळ शीखच नव्हे तर सर्वच धर्मांच्या बाततील हा लढा सुरू आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींच्या आजी असलेल्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातल्या ऑपरेशन ब्लू स्टारमुळे त्यांच्याच माथेफिरू सुरक्षारक्षकानं गोळ्या घालून हत्या केली होती. याचाच दाखला भाजपच्या माजी आमदारानं दिल्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरलीय. राहुल गांधींनी केवळ भाषणादरम्यान शीख तरुणाचा दाखल देत ही टीका केली. मात्र या विधानावरून थेट त्यांना जीवे मारण्याची धमकी देणं कितपत योग्य? असा सवाल केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT