Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, सहमत नाहीच

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले असून त्यांच्यावर चौहीबाजूने टीका होत आहेत. अशातच राज्यपालांच्या वक्तव्यावर भाजप नेते तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Dadnavis Latest News)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाहीच. महाराष्ट्राच्या विकासामध्ये तसेच वाटचालीमध्ये मराठी माणसाचं श्रेय सर्वाधिक असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. याशिवाय उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसानं जी प्रगती केली आहे. त्यामुळे आज जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालेलं आहे. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, हे खरचं आहे की, महाराष्ट्राच्या प्रगतीत वेगवेगळ्या समाजाचं योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. मग तो गुजराती समाज असेल, मारवाडी समाज असेल, पण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसांचा सहभाग सर्वात जास्त आहेत. मग ते मराठी उद्योजक असतील, मराठी साहित्यिक असतील, किंवा मराठी क्षेत्रातील वेगवेगळे लोकं असतील त्यांचं योगदान सर्वाधिक आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (Bhagat Singh Koshyari News)

'कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेकवेळा अतिशोक्ती अलंकार हा वापरला जातो. तशाच प्रकारे माननीय राज्यपाल बोलले आहेत. मला विश्वास आहे की, त्यांच्याही मनामध्ये मराठी माणसांबाबत श्रद्धा आहे आणि त्यांनाही पूर्णपणे याची जाणीव आहे की, मुंबई महाराष्ट्र किंवा देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग हा मोठा आहे'. असं फडणवीस म्हणालेत.

राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही: आशिष शेलार

दरम्यान, राज्यपालांच्या वक्तव्यानंतर भाजप बॅकफूटवर गेली असल्याचं बोललं जातंय. भाजप नेते आशिष शेलार यांनी सुद्धा राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचं म्हटलं आहे. 'मा. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये!' असं ट्विट भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpari Chinchwad News: 'भाऊंच्या विरोधकाला जागा दाखवा', पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टर वॉर; अज्ञातांनी लावले बॅनर

Today's Marathi News Live : लोकसभेच्या चौथ्या टप्पासाठी भाजपचा मास्टर प्लान; महाराष्ट्रासाठी खास रणनिती

Uddhav Thackeray News: नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशातील लोकशाही संपणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Diabetes: उन्हाळ्यात मधुमेह रूग्णांनी प्या हे 4 हेल्दी ज्यूस, राहाल हायड्रेट

Srikanth Film : श्रीकांत बोला यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना भावला, राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक

SCROLL FOR NEXT