BMC Standing Committee  Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: मुंबई महापालिका मुदत संपत असताना शेवटच्या दिवशीही भाजप नगरसेवकांकडून स्थायी समिती सभागृहात गोंधळ

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई महापालिका मुदत संपत असताना शेवटच्या दिवशीसुद्धा भाजप नगरसेवकांकडून महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गोंधळ घालण्यात आला. कुठल्याही प्रकारची चर्चा न करता शेवटच्या दिवशी प्रस्ताव मंजूर केल्याने सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार शिवसेना करत असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे (BJP Corporators Make Chaos At BMC Standing Committee Hall).

मुंबई महापालिकेची (BMC) आज मुदत संपताना आज शेवटची स्थायी समितीची बैठक पार पडली. यामुळे जवळपास 360 प्रस्ताव मांडण्यात आले. त्यातील बहुतांश प्रस्ताव हे मंजूर करण्यात आले. भाजप नगरसेवकांकडून उद्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करत असताना हरकतीचा मुद्दा मांडण्यात आला. मात्र, भाजप नगरसेवकांचं कुठल्याच प्रकारे ऐकून न घेतल्याने भाजप नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ घालायला सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ -

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हे सर्व प्रस्ताव मंजूर करून 306 हजार कोटींचा भ्रष्टाचार शिवसेना करत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. याविरोधात भाजपकडून मुंबई महापालिका आयुक्तांच्या कार्यालय बाहेरसुद्धा फलक घेऊन आंदोलन करण्यात आले.

भाजप आता वैफल्यग्रस्त झाले आहेत

भाजप यापुर्वी आमच्यासोबत होती. शिवसेना (Shivsena) पारदर्शक कारभार करते. हे त्यांना माहीत आहे. परंतु ते आता वैफल्यग्रस्त झाले आहेत. स्थायी समिती वैधानिक समिती आहे. नियमाप्रमाणे हरकतीचा मुद्दा कधी घ्यायचा हा अधिकार अध्यक्षांना असतो प्रस्ताव सर्वात जास्त आज होते. मी त्यांना नंतर हरकती सांगा बोललो, पण त्यांना हंगामा करायचा होता त्यांनी तो केला. शिवसेना मुंबईकरांच्या हिताचे निर्णय घेते आहे, ते यापुढेही घेणार, असं यशवंत जाधव (Yashwant Jadhav) म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पोलिसांना पाहून घाबरला, थेट दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; नेमकं काय घडलं? वाचा...

Salt Effect On Health: आहारात मीठाचं सेवन जास्त प्रमाणात करताय? आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Indian Port Workers Salary : बंदर आणि गोदी कामगारांना घसघशीत पगारवाढ; पगार किती टक्क्यांनी वाढणार? वाचा

Bribe Case : शाळेतील शिपायाकडून १० हजाराची मागणी; मुख्याध्यापक एसीबीच्या ताब्यात

Hasan Mushrif : 'मी पवारांना गुरुदक्षिणा दिली, पण ..' ; हसन मुश्रीफांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT