भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मोठी घोषणा केली. येत्या ८ महिन्यात राज्यातील १५ लाख भाविकांना अयोध्येतील श्री राम मंदिरात दर्शनासाठी घेऊन जायचे आहे. देशातील सर्वात मोठी दिवाळी २२ जानेवारी २०२४ रोजी साजरी होईल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत ‘सेल्फी विथ मेरी माटी’ या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकतीच नोंद झाली. हा विश्वविक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला.
यावेळी बावनकुळे बोलत होते. कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. (Latest Marathi News)
येत्या ८ महिन्यात राज्यातील १५ लाख भाविकांना अयोध्येतील श्री राम मंदिरात दर्शनासाठी नेण्याची जबाबदारी राजेश पांडे यांना दिल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ‘‘देशात राबविलेला ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम देशासाठी बलिदान दिलेल्यांना समर्पित आहे".
"या उपक्रमात देशातील एक कोटी ४० लाख नागरिक सहभागी झाले. तर या उपक्रमातंर्गत राज्यात झालेला ‘सेल्फी विथ मेरी माटी’चा विश्वविक्रम कौतुकास्पद आहे.’’, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. यावेळी पाटील यांनी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाच्या विश्वविक्रमाद्वारे आपण चीनला मागे टाकल्याचा आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमात विश्वविक्रम नोंदविण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. ‘‘या विश्वविक्रमासाठी जवळपास २५ लाख नागरिकांनी सेल्फी पाठविले होते. त्यातील जवळपास १० लाख ४२ हजार सेल्फी विश्वविक्रमासाठी ग्राह्य धरण्यात आले’’, अशी माहिती पांडे यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.