Jalyukta Shivar Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Jalyukta Shivar Yojana 2:0 : राज्यात जलयुक्त शिवार 2.0 अभियानाला गती मिळणार आहे. यासाठी राज्यात जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Eknath shinde News
Eknath shinde News Saam Digital
Published On

Eknath Shinde News:

शेतकऱ्यांसाठी महत्वाचं वृत्त हाती आलं आहे. राज्यात जलयुक्त शिवार 2.0 अभियानाला गती मिळणार आहे. यासाठी राज्यात जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला, असेही त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

मुंबईतील हॉटेल ताज येथे झालेल्या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रवीशंकर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath shinde News
Maharashtra Rain : अवकाळी पावसाचा राजकीय नेत्यांना फटका; थोडक्यात बोलत संपवले भाषणांचे कार्यक्रम

सरकार कोणत्या जिल्ह्यात कामे करणार?

जलयुक्त शिवार २ मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली.

या कराराद्वारे राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर,नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा एकूण २४ जिल्ह्यातील ८६ तालुक्यात जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची आहे. याचबरोबर जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेत तळे कामे होणार आहेत. यासाठी तीन वर्षांचा कालावधी असेल.

राज्य सरकारच्या कृषी विभागाशी झालेल्या करारानुसार राज्यात व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने आणि खतांवर आधारित पारंपरिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करेल.

चांगल्या योजनेसाठी गुरूदेवांचा आशीर्वाद

'आपण नेहमी म्हणतो की, जल हे तो कल है. पण हे पाणी जपून ठेवण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. ग्लोबल वॉर्मिगमुळे आज अनेक पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात चांगलं यश मिळालं. आज करारामुळं जलयुक्त शिवराच्या कामाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची जोड देऊ शकलो ही मोठी गोष्ट आहे. मिशन मोडवर आम्ही जलयुक्त शिवार 2 टप्पा राबविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Eknath shinde News
Sharad Pawar in Kalyan: '56 वर्षांपूर्वी पहिल्यांदा निवडून गेलो, तेव्हा...'; शरद पवारांनी दिला शेकापच्या माजी आमदाराच्या आठवणींना उजाळा

धरणांमधील गाळ काढणार

'धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झालेला आहे. त्यामुळे तेथील साठवणूक क्षमता वाढविण्यावर शासन काम करत आहे. कॅन्सरसारखे रोग वाढत चालले आहे. त्यासाठी आपण सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जलयुक्त शिवारचे देशात यश : देवेंद्र फडणवीस

'जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या 22 हजार गावांमध्ये मोठं काम झालं. केंद्राने 2020 मध्ये जो अहवाल दिला, त्यात महाराष्ट्रातला वॉटर टेबल इतर सर्व राज्यांच्या तुलनेनेवर आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. यामध्ये अर्थातच आर्ट ऑफ लिव्हिंगचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितलं.

यामाध्यमातून विषमुक्त शेतीचा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम राबवून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करणार आहोत, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com