Sharad Pawar in Kalyan: '56 वर्षांपूर्वी पहिल्यांदा निवडून गेलो, तेव्हा...'; शरद पवारांनी दिला शेकापच्या माजी आमदाराच्या आठवणींना उजाळा

Sharad Pawar speech in kalyan: कल्याणमधील कार्यक्रमात उपस्थितांशी बोलताना शरद पवारांनी कल्याण आणि शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार कृष्णराव धुळप यांच्या आठवणींना उजाळा दिल्या.
sharad pawar
sharad pawarsaam tv
Published On

अभिजीत देशमुख,कल्याण

Sharad Pawar News:

राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार हे आज रविवारी कल्याणच्या दौऱ्यावर होते. शरद पवारांनी आज कल्याणमधील एका खासगी शाळेच्या सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांशी बोलताना शरद पवारांनी कल्याण आणि शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी आमदार कृष्णराव धुळप यांच्या आठवणींना उजाळा दिल्या. (Latest Marathi News)

कल्याणमधील खासगी शाळेच्या सभागृहाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, '56 वर्षांपूर्वी पहिल्यांदा निवडून गेलो, तेव्हा तरुण आमदारांना कल्याण विधानसभेचे तत्कालीन आमदार कृष्णराव धुळप मार्गदर्शन करायचे. ते अत्यंत हुशार ज्ञानी होते'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

sharad pawar
Chhagan bhujbal: शिंदे समिती ताबडतोब बरखास्त करा, भरसभेत भुजबळांनी सरकारला सांगितल्या OBC समाजाच्या मागण्या

शरद पवारांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

'आम्हाला महत्वाच्या प्रश्नांची माहिती नसेल तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे जायचो आणि समजून घ्यायचो. त्यामुळे माझ्या राजकारणाच्या सार्वजनिक कामाच्या सुरुवातीच्या काळात कल्याणचा ऋणानुबंध येतो. मला आनंद आहे की त्याच कल्याणमध्ये दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली, असे बोलत शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शरद पवारांच्या कल्याण दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

दरम्यान, शरद पवार कल्याणमध्ये खासगी शाळेच्या सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते. अनेक वर्षानंतर शरद पवार कल्याणमध्ये आल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह दिसून आला.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्या जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रिपूल येथे जेसीबीने शरद पवार यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर शरद पवार जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या निवासस्थानी गेले. त्यांची भेट घेत ते नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

sharad pawar
Supriya Sule Speech:...तर मला वर्ध्यातून निवडणूक लढायला आवडेल; सुप्रिया सुळेंनी सांगितली मनातली इच्छा

शरद पवार येणार म्हणून दुकाने झाकली...

जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या घरी शरद पवार पोहचले. तेव्हा पवार येणार आहेत म्हणून परिसरातील रस्त्यावरील दुकाने पांढऱ्या कपड्याने झाकली गेली होती. लोकांमध्ये एकच चर्चा रंगली होती.

शरद पवार हे भेट देऊन गेल्यावर दुकानदारांनी त्यांची दुकाने उघडली. याबाबत राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ते आमचेच कार्यकर्ते आहे. स्वत:हून दुकाने बंद करुन स्वागताला आले आहेत, असा खुलासा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com