MAHARASHTRA ELECTIONS  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : मोठी बातमी! भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले, आयोगाची मोठी कारवाई

BJP candidate son caught transporting liquor in Pune : पुण्यात नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग करत भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune Crime Latest News : नगर परिषदा अन् महापालिका निवडणुकीसाठी राज्यात सध्या आचारसंहिता लागलेली आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग करताना भाजप उमेदवाराच्या मुलाला आयोगाने रंगेहाथ पकडले आहे. भाजप उमेदवाराच्या मुलासह दोन जणांना प्रचारात मद्य वाहतूक करताना आयोगाच्या पथकाने पकडले. मध्यरात्री पोलीस आणि आयोगाने ही कारवाई केली. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली.

पुण्यातील ऊरळी देवाची नगरपरिषदेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात हडपसरमधील फुरसुंगी भागात भाजप उमेदवाराच्या मुलासह दोघांना मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले. या कारवाईत मद्याच्या बाटल्यासह मोटार असा ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली.

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या पथकाने रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी वेदांत राहुल कामठे (वय १९), आकाश तुकाराम मुंडे (वय २४, दोघे रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुहास गवळी (वय ३६, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत कामठे हा भाजप उमेदवार राहुल कामठे यांचा मुलगा आहे. गवळी हे निवडणूक आयोगाच्या पथकात नियुक्तीस आहेत.

निवडणूक काळात या पथकाकडून आचारसंहिता पालन, तसेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. रात्री फुरसुंगी परिसरात तपासणी नाक्यावर गवळी नियुक्तीस होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून फुरसुंगीकडे भरधाव कार निघाली होती. ती कार तपासणीसाठी थांबवली असता त्यात मद्याच्या बाटल्या सापडल्या. मद्याच्या बाटल्यांबाबत पथकातील कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. तेव्हा दोघांनी समाधानकारक उत्तर दिले नाहीत. बेकायदा मद्य वाहतुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारीसह मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT