Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Ladki Bahin scheme ₹1500 controversy : अकोल्यात भाजपकडून ‘मत दिले नाही तर लाडकी बहीण योजनेचा ₹१५०० निधी बंद करू’ असा प्रचार सुरू असल्याचा आरोप अशोक ओळंबे यांनी केला आहे.
Ladki Bahin scheme
Ladki Bahin schemeSaam
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

BJP accused of blackmailing voters in Akola : 'आम्हाला निवडून दिले नाही तर लाडकी बहिणीचा १५०० रूपयांचा निधी बंद होईल, असे म्हणत भाजपकडून मतदारांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे, असा आरोप भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक ओळंबे यांनी केला आहे. ते अकोल्यात बोलत होते.

अशोक ओळंबे हे अकोल्यासाठी भाजपकडून विधानसभा लढवण्यास इच्छूक होते, पण त्यांना तिकिट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. पण भाजपच्याच मतांचे विभाजन झाले अन् याच फायदा काँग्रेसला झाला. निवडणुकीनंतर भाजपकडून ओळंबे यांच्यावर निलंबानाची कारवाई करण्यात आली. महापालिका अन् जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वेगळी आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. प्रचारावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

Ladki Bahin scheme
CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

अकोल्यात भाजपच्या माजी नगरसेवकांकडून 'मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद पडेल' असा प्रचार पसरवला जात आहे, असा आरोप अशोक ओळंबे यांनी केला. ते अकोल्यात भाजपच्या बंडखोरांच्या सहविचार सभेत बोलत होते. या सहविचारसभेत भाजपचे 7 माजी नगरसेवक आणि भाजपचे नाराज असलेले पदाधिकारी उपस्थित होते.. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा आणि अकोला महापालिकेचा काहीही संबंध नाहीये.. त्यामुळे 'आम्हाला निवडून नाही दिल्यास तुमचा लाडकी बहिणीचा निधी बंद होईल, असं मतदारांना ब्लॅकमेलिंग सुरु असल्याचे ओळंबे म्हणाले.

Ladki Bahin scheme
नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

500 कोटींच्या विकास निधीवरून त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले. महापालिकेच्या वाढीव भागासाठी आलेला पाचशे कोटीचा निधी जंगल भागात वळवल्याचा आरोप त्यांनी केलाय. ज्या ठिकाणी कुणीही राहत नाही, तिथे लेआऊट पडले आहे, ते धनाड्य आणि जनप्रतिनिचे असून तिथेच भूमिकत गटार योजनेच्या काम या निधीतून सुरू असल्याचा आरोपही ओळंबे यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातली राजकारण तापले आहे. भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा पुतण्या आशिष पवित्रकार यांनी नाराज भाजप बंडखोरांची मोट बांधली.

Ladki Bahin scheme
Weather Forecast: आजचे हवामान! ५ राज्यांना पावसाचा इशारा, तर १८ शहरावर दाट धुक्याचे सावट, महाराष्ट्रात काय स्थिती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com