Andheri by Election Saam Tv
मुंबई/पुणे

Andheri By-election: अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंविरोधात उमेदवार ठरला, भाजपकडून मुरजी पटेलांना उमेदवारी जाहीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांच्याविरुद्ध भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र मुरजी पटेल भाजपचे उमेदवार या निवडणुकीत रिंगणात असतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आशिष शेलार यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. मुरजी पटेल उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत.

मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच दुपारी एक पोस्टर व्हायरल झालं होते. या पोस्टरमध्ये लिहिलं होतं की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने आपले लाडके नेते आणि अधिकृत उमेदवार मुरजी पटेल (काका) मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत. (Latest Marathi News)

ऋतुजा लटके यांना हायकोर्टाचा दिलासा

त्याआधी अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश हायकोर्टाने (High Court) मुंबई महापालिकेला दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

SCROLL FOR NEXT