Anil Bonde  SaamTv
मुंबई/पुणे

Rajya Sabha Election: महाविकास आघाडीतला एक संजय नक्की जाणार; अनिल बोंडेंचा रोख नेमका कोणाकडे?

भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी राज्यसभा निवडणुकीत आपण १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. २४ वर्षानंतर राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारे मतदान होत असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होणार असा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एकमेकांवर केला. दरम्यान यावेळी भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी मोठं विधान केलं आहे.

भाजपाचे (BJP) उमेदवार अनिल बोंडे(Anil Bonde) यांनी राज्यसभा निवडणुकीत आपण १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसं या निवडणुकीत कुणीतरी एक संजय जाणार हे नक्की असे देखील बोंडे यावेळी म्हणाले.

हे देखील पाहा -

यावेळी अनिल बोंडे यांना संजय राऊत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, कोणता अश्वत्थामा गेला होता हे देखील धर्मराजाने त्यावेळी सांगितले नव्हते. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते लवकरच कळेल असे उत्तर अनिल बोंडे यांनी यावेळी दिले.

महाविकास आघाडीतील एकुणीतरी एक संजय जाणार हे नक्की आहे. कोण ते ५.३० वाजता कळेल असे व्यक्तव्य त्यांनी यावेळी केलं. संध्याकाळी कोणत्या संजयला समजवण्यासाठी जातील ते पाहूयात असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच भाजपाचे तिन्ही उमेदवार १०० टक्के विजयी होणार. कारण देवेंद्र फडणवीस यांचा धाक आहे असे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवार आणि संजय राऊत या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल बोंडे यांचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT