निलेश बोरुडे, पुणे
Pune News: पुण्यातल्या सिंहगडाला (Sinhagad) लागून असलेल्या गावाजवळ गवा दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा गवा गावामध्ये घुसू नये यासाठी वन विभागाच्या टीमकडून (Forest Department) सकाळपासून पहारा देण्यात आला आहे. हा गवा शेतामध्ये फिरत असल्यामुळे शेताकडे जाण्यासाठी गावकरी घाबरत आहे. सध्या या गव्याला रेस्क्यू (Rescue) करण्यासाठी वन विभागाच्या टीमकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगडाला लागून असलेल्या मनेरवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीत सकाळी गवा दिसल्यामुळे एकच खळबळ उडाली. गवा दिसल्यानंतर काही शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा गवा गावामध्ये येऊ नये यासाठी सकाळपासून प्राथमिक बचाव पथकाचे जवान गव्याभोवती खडा पहारा देत आहेत. वन विभागाच्या पथकासह रेस्क्यु टीमही मनेरवाडी येथे पोहचली आहे.
भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले की, हा गवा सध्या डोंगर कड्याशेजारी बसला आहे. तो भेदरून जाऊन काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. जंगलाचा परिसर असल्याने गव्याला पकडणे अवघड आहे. रेस्क्यु टीमच्या माध्यमातून या गव्याला नैसर्गिक अधिवासाकडे हुसकावून लावण्यात येणार आहे. तसेच त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.' तसंच, शेतकरी, नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच विनाकारण गवा भेदरून काही विपरीत घटना घडेल असे कृत्य करु नये, असे आवाहन प्रदीप संकपाळ यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.