Satara News: शेतात काम करणाऱ्या महिलेवर गव्याचा हल्ला, उचारादरम्यान महिलेचा मृत्यू

Women Death after Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Satara News
Satara NewsSaam Tv
Published On

Satara Crime News: साताऱ्यामध्ये (Satara) गव्याच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतामध्ये काम करत असताना या महिलेवर गव्याने हल्ला (bison attack) केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Satara News
Uday Samant On Barsu Project:'प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली पक्षाचे राजकारण करु नका', उदय सामंतांचा संजय राऊतांवर निशाणा

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील रिसवड गावात ही घटना घडली आहे. गव्याचा हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. हिराबाई गोपीनाथ पवार (वय 42) असं मृत महिलेचे नाव आहे. हिराबाई या आपल्या शेतामध्ये काम करत होत्या. त्याचवेळी गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हिराबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या होत्या.

Satara News
Barsu Refinery Protest: मोठी बातमी! बारसूत आंदोलन चिघळलं, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज; दोन जण जखमी

गव्याच्या हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या हिराबाई यांना त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान हिराबाई यांचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे हिराबाई यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. साताऱ्याच्या या परिसरात दिवसेंदिवस वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. गव्याच्या हल्लेत महिलेचा मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसरले आहे.

Satara News
Sushma Andhare News: 'गावात रस्ते नाहीत पण, शेतात हेलिपॅड..' सुषमा अंधारेंची CM शिंदेंवर खोचक टीका; बारसू रिफायनरी आंदोलनावरुन सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, सांगली जिल्ह्यातल्या मणदूर येथे आज सकाळी गव्याने एका व्यक्तीवर हल्ला केला होता. अशोक विष्णू सोनार हे गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. वारणा डाव्या कालव्याजवळ काळंबा मंदराजवळ गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. जखमी अशोक सोनार यांना मणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कराडला हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे मणदूर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com