Uday Samant On Barsu Project:'प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली पक्षाचे राजकारण करु नका', उदय सामंतांचा संजय राऊतांवर निशाणा

Latest News: 'दोन्ही राऊतांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे.', अशी टीका त्यांनी यावेळी केली.
Uday Samant
Uday Samant saam tv
Published On

Mumbai News: बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन (Barsu Project) वाद आता चांगलाच वाढत चालला आहे. या प्रकल्पावरुन राज्य सरकारवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसंच विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर देखील त्यांनी यावेळी टीका केली. 'प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली पक्षाचे राजकारण करू नका. दोन्ही राऊतांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे.', अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Uday Samant
Jiah Khan Case: जिया खान प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय

उदय सामंत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बारसू प्रकल्पावर टीका करणाऱ्या संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर टीका केली. त्यांनी यावेळी सांगितले की 'विनायक राऊतांनी कलम 144 चं उल्लघंन केलं म्हणून त्यांना ताब्यात घेतलं. प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली पक्षाचे राजकारण करू नका. दोन्ही राऊतांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे.' 'जिथे मोर्चा आहे तिथे विनायक राऊतांनी जावे. जिथे परिक्षण सुरु आहे तिथे ते का जात आहेत?, असा सवाल यावेळी उदय सामंत यांनी केला.

Uday Samant
Sushma Andhare News: 'गावात रस्ते नाहीत पण, शेतात हेलिपॅड..' सुषमा अंधारेंची CM शिंदेंवर खोचक टीका; बारसू रिफायनरी आंदोलनावरुन सरकारवर हल्लाबोल

उदय सामंत यांनी यावेळी बारसूच्या जागेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवणाऱ्या ठाकरे सरकारवर देखील निशाणा साधला. 'पूर्वीच्या सरकारचं जे ध्येयधोरण ठरलेलं आहे त्यानुसार होत आहे. पत्र देताना ग्रामस्थांची चर्चा केली नव्हती. आता का एवढा टाहो फोडला जात आहे.', अशी टीका त्यांनी केली. तसंच, 'काही जणं पत्रव्यवहार करून वातावरण तापवत आहेत. शेतकर्यांना समोर आणून मागून राजकारण केलं जात आहे.' अशी देखील टीका त्यांनी केली.

Uday Samant
Barsu Refinery Latest Update: बारसू आंदोलकांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार विनायक राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

'मुंबईतले समाजसेवक हे रिफायनरीच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. अजून कोणतंही नोटिफीकेशन निघालेलं नाही. त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना अन्य काहीही माहिती हवी असल्यास ती देण्यात येईल. पण राजकारण करु नका.', असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासोबतच, 'शेतकऱ्यांना तिथे पेटवण्यापेक्षा त्यांच्या चुली पेटवणं गरजेचं आहे. कुठेही दडपशाही करून हा प्रकल्प रेटायचा नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होणार अशी आमचीही भूमिका आहे. बेरोजगारीचा प्रश्न मिटवायचा आहे. तर त्याचाही विचार व्हायला हवा', असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com