Three accused shooters linked to the Bishnoi gang arrested by Pimpri Chinchwad Police in connection with the Ravet firing incident. saam tv
मुंबई/पुणे

बिश्नोई गँगच्या 3 शार्पशूटरांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या; गायकाच्या हत्येचे कनेक्शन

Bishnoi Gang Shooters Arrested In Pimpri Chinchwad Ravet Firing Case: पिंपरी चिंचवडमधील रावेत परिसरात एजे फर्निचर मॉलवर गोळीबार करणाऱ्या बिश्नोई गँगच्या तीन शार्पशूटरांना पोलिसांनी हरिद्वारमधून अटक केली.

Omkar Sonawane

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात असलेल्या एजे फर्निचर मॉलवर 15 मे रोजी रात्री सहा-सात राऊंड अंदाधुंद गोळीबार करून व्यापाऱ्याच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कुख्यात बिश्नोई गँगच्या दोन शूटर नी केला होता. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती. या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी हरिद्वार येथे जाऊन ए जे फर्निचर मॉल वर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या बिश्नोई गँगच्या तीन शूटरना बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पोलीस पथकाने हरिद्वार येथे जाऊन बिश्नोई गँगच्या परविन रामनिवास (वय 22), पंकज कुलदीप (वय 21), आणि सागर अजयपाल (वय 21) या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील परविन रामनिवास हा आरोपी दिवंगत सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्या खुनाच्या कटातील आरोपीचा नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासास समोर आली आहे.

आरजू बिश्नोई यांच्या सांगण्यावरून फक्त अडीच लाख रुपयात या आरोपींनी रावेत येथील एजे फर्निचर मॉलवर अंदाधुंद गोळीबार करून एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक जैन यांना धमकवण्याचा प्रयत्न केला आहे. एजे फर्निचर मॉलवर गोळीबार करण्यासाठी या आरोपींना आरजू बिश्नोई यांच्याकडून दोन देशी कट्टे आणि 23 जिवंत काडतुसे आणि पन्नास हजार रुपये अनामत रक्कम देण्यात आली होती. तसेच या आरोपीकडून हरियाणातील सोनीपत या ठिकाणी गोळीबार करण्याचा सराव देखिल बिश्नोई गँग ने दिला होता.

एजे फर्निचर मॉलवर गोळीबार करण्यासाठी आरोपी हे खाजगी ट्रॅव्हल्स द्वारे पिंपरी चिंचवड शहरात दाखल होऊन एका लॉजमध्ये वास्तव्यास होते. पोलीस तपासात त्या लॉज मध्ये मिळालेल्या एका संदिग्ध आधार कार्ड वरून पोलिसांनी या आरोपीचा हरिद्वार पर्यंत जाऊन छडा लावला आहे. यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड शहरातील दोन जणांना बिश्नोई गँगकडून कोट्यावधी रुपयाची खंडणी उकडण्यासाठी धमकी दिल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्या खंडणी प्रकरणाशी या आरोपीचा काही संबंध आहे का ? तसेच या आरोपींना पिंपरी चिंचवड शहरात ए जे फर्निचर मॉलवर गोळीबार करण्यासाठी कोणी दुचाकी वाहन देऊन मदत केली? या सर्व बाबींचा तपास आता पिंपरी चिंचवड शहर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT