Big Update on Pune Isis Module Case NIA chargesheet makes sensational claims
Big Update on Pune Isis Module Case NIA chargesheet makes sensational claims Saam TV
मुंबई/पुणे

Pune ISIS Module: पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात मोठी अपडेट; एनआयएच्या आरोपत्रात खळबळजनक खुलासा

Satish Daud-Patil

Pune ISIS Module Latest Updates

पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून एनआयएने धक्कादायक खुलासे केले आहेत. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी आखला होता. त्यासाठी त्या दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, असा दावा एनआयएने आरोपत्रात केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इसिस प्रकरणातील सर्व आरोपी उच्चशिक्षित असून लाखो रुपये कमवायचे, असं एनआयएने आरोपपत्रात म्हटलं आहे. यातील जुल्फीकार अली हा आरोपी एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला होता. त्याला वार्षिक ३१ लाख रुपये पगार होता. उर्वरित आरोपीपैकी शाहनवाज शैफुजामा हा मायनिंग इंजिनिअर होता त्यामुळे त्याला स्फोटकांचं चांगल ज्ञान होतं, असा दावाही एनआयएने केला आहे. (Latest Marathi News)

तिसरा आरोपी कादीर पठाण पुण्यात ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता. त्याने सोबत असणाऱ्या दोन सहकाऱ्यांना इम्रान खान आणि युनूस साकी यांनाही ग्राफिक्सच ज्ञान दिल होतं. आरोपी आपली ओळख लपून राहावी यासाठी ही वेगवेगळी काम करुन पैसे कमवत होते, असंही एनआयएने (NIA) आरोपपत्रात म्हटलं आहे.

आरोपींना मोहम्मद नावाचा एक हॅंडलर ऑपरेट करत होता. शिवाय आयईडी बॉम्ब बनवण्याच काम आरोपीकडून युद्धपातळीवर सुरु होतं. या आरोपींनी आयईडी स्फोटक बनवण्यासाठी केमिकल्स खरेदी केले होते. केमिकल्ससाठी ते कोडवार्डस् वापरत होते, असा खळबळजनक दावा करत एनआयएने आरोपत्रात कोडवर्ड्स देखील सांगितले आहेत.

काय आहेत कोडवर्ड्स

आरोपी सल्फरिक एसिडसाठी विनेगार हा कोडवर्ड वापरत होते. तर अॅसेटॉन या केमिकल्ससाठी रोजवॉटर, हायड्रोजन परक्सॉइडसाठी शरबत हा कोडवर्ड वापरायचे, असंही एनआयएने आरोपपत्रात नमूद केलं आहे. आरोपींनी साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून दहशत निर्माण करण्याचा कट आखला होता, असंही एनआयएने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदी मुंबईत विविध ठिकाणी भेट देणार

Mumbai Mega Block News : 17 मे पासून मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवेवर होणार परिणाम

Bhubaneswar Pune Special Train: पुणेकरांनाे! भुवनेश्वर-पुणे रेल्वे सोलापूरपर्यंतच धावणार, जाणून घ्या कारण

Mahadev Betting Case Update: महादेव बेटिंग घोटाळ्यात जर्मन कनेक्शन उघड, अॅपवर ७ जणांचं नियंत्रण, नावं आली समोर

Devendra Fadnavis : 'सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते'; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT