Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकची खासगी बसला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Samruddhi Highway Accident News : खाजगी लक्झरी बसचा रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident Saam TV

संजय जाधव

Buldhana News :

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर मेहकरनजिक खाजगी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. खाजगी लक्झरी बसचा रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली.

गणराज ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होती. सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास मेहेकरनजिक बसच्या टायरची हवा चेक करण्यासाठी खाली उतरला होता. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात बस चालक जागीच ठार झाला. तर बस मधीलच एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण 37 प्रवाशी प्रवास करत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Samruddhi Mahamarg Accident
Bus Accident: कोल्हापुरात भीषण अपघात, भरधाव ट्रॅव्हल्स वारणा नदीत कोसळली; भयानक VIDEO

कोल्हापुरात बस नदीत कोसळली

गोव्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येणारी ट्रॅव्हल्स बस शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावरून वारणा नदीपात्रात कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

Samruddhi Mahamarg Accident
Hingoli Earthquake News : हिंगोलीकर साखर झोपेत असताना जमिनीतून गूढ आवाज आणि हादरे, नागरिकांमध्ये घबराट

ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढत दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आलं आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com