Akshay Shinde Encounter Case Saam TV
मुंबई/पुणे

Akshay Shinde : अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला की केला? सर्वात मोठी अपडेट समोर

Akshay Shinde Encounter Latest News : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला की केला? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.

Satish Daud

बदलापूर येथील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. सोमवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. या खळबळजनक घटनेनं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अक्षयचा एन्काऊंटर झाला की केला? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. तर अक्षय हा साधूसंत नव्हता त्याने आधी पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून हा एन्काऊंटर झाला आहे, असा आरोप अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केला आहे. आमच्या मुलगा फटाक्यांनाही घाबरत होता. रस्ता ओलांडताना तो हात पकडायचा, असंही आरोपीच्या कुटुंबियांनी म्हटलंय. दरम्यान, अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

अक्षयचा एन्काऊंटर झाला की केला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलीस आरोपी अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर येथे घेऊन जात होते. यावेळी त्याने पोलिसांच्या हातातून बंदूक हिसकावली. काही क्षणातच आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला.

या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर आरोपी अक्षय हा पळून जाण्याच्या तयारीत होता. ही बाब पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या लक्षात आली. त्यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीच्या हातात बंदूक होती. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ संजय शिंदे यांनी आरोपी अक्षयच्या दिशेने तीन राऊंड फायर केले.

यातील एक गोळी अक्षयचा डोक्यात लागली आणि तो गंभीर जखमी झाला. यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी तातडीने एका रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अक्षयच्या एन्काउंटरची वार्ता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाल्याचे कळताच अनेकांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

दुसरीकडे विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेवरून काही सवाल उपस्थित केले. एखाद्या आरोपीला घेऊन जायचे असल्यास पोलीस त्याच्या तोंडावर काळा कपडा टाकतात. इतकंच नाही तर त्याच्या हातात बेड्याही घालतात. तरी देखील आरोपीने पोलिसांची बंदूक कशी हिसकावली? असे प्रश्न काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केले आहेत. पोलिसांची लॉक बंदूक अचानक अनलॉक कशी झाली? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: काळेभोर आणि दाट केसांसाठी एकदा ट्राय करा 'हे' उपाय

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

SCROLL FOR NEXT