Badlapur Akashay Shinde Case Saam TV
मुंबई/पुणे

Akshay Shinde : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अक्षय शिंदेच्या खिशात चिठ्ठी होती, आईचा खळबळजनक दावा

Akshay Shinde Mother Statement : अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने मोठा आरोप केला आहे.

Satish Daud

बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. सोमवारी पोलीस व्हॅन अक्षयला घेऊन तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने निघाली होती. मात्र, वाटेतच त्याने पोलिसांचे पिस्तूल हिसकावले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. या गोळीबार एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाला आहे. दरम्यान, अक्षयच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने मोठा आरोप केला आहे.

या आरोपामुळे बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर त्याच्या आई आणि वडिलांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "आम्ही सोमवारी सकाळी अक्षयला भेटण्यासाठी तळोजा जेलमध्ये गेलो होता. तेव्हा तिथे उपस्थितीत असलेल्या पोलिसांनी आम्हाला ३ वाजता येण्यास सांगितलं. त्यानुसार आम्ही ३ वाजता परत तळोजा जेलमध्ये गेलो. साधारण साडेतीन वाजेच्या सुमारास आमच्या अक्षयसोबत भेट झाली".

"अक्षय मला म्हणाला की, चार्जशीट आली आहे, पण हे लोक मला कधी सोडणार. तेव्हा मी त्याला सांगितलं की अजून एक महिना तरी थांबावं लागेल. माझ्या पोराच्या खिशात एक चिठ्ठी होती. तिथल्या काही मुलांनी त्याला ही चिठ्ठी दिली असं अक्षयने मला सांगितलं. त्यात काय लिहलं होतं हे आम्हाला समजलं नाही. कारण मला वाचता येत नव्हतं. याशिवाय अक्षय देखील शिकलेला नसल्याने त्यालाही वाचता येत नव्हतं".

"अक्षयला जेलमध्ये टाकल्यानंतर आम्ही त्याला आतापर्यंत तीनवेळा भेटलो. प्रत्येक वेळी त्याने मला सांगितलं की मी काहीही केलं नाही. तळोजा जेलमधील कैदी आणि पोलीस मला खूप मारतात, असंही अक्षयने मला सांगितलं. माझा मुलगा बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करूच शकत नाही. कारण तो साध्या फटाक्यांच्या आवाजाला सुद्धा घाबरायचा. रस्ता ओलांडतानाही तो हात पकडायचा. कुणीतरी पैसे देऊन त्याला मारलं आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी", अशी मागणी अक्षयच्या आईने केली. दरम्यान, अक्षयला तुरुंगात नेमकी कुणी चिठ्ठी पाठवली? त्यात नेमकं काय होतं? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT