ICICI Bank loan Fraud Case Saam Tv
मुंबई/पुणे

ICICI Bank loan Fraud Case : मोठी बातमी! कोचर दाम्पत्याला दिलासा, ICICI बँक घोटाळाप्रकरणी जामीन मंजूर

सीबीआयची कारवाई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवली

सुरज सावंत

ICICI Bank loan Fraud Case Update : आयसीआयसी बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज फसवणूक प्रकरणात आयसीआयसी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना दिलासा मिळाला आहे. अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. एक लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सीबीआयची कारवाई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे. 

आयसीआयसी बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज फसवणूक प्रकरणात चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता हायकोर्टाने कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. कोचर दाम्पत्याने सीबीआयने केलेली अटक बेकायदेशीर असल्याच्या याचिका हायकोर्टात दाखल केली होती. सीबीआयची कारवाई बेदायदेशीर असल्याचा दावा करत जेलमधून तात्काळ सुटकेची मागणी कोचर यांनी कोर्टाकडे केली होती.

त्यानंतर 1 लाख रुपयांच्या जामीनावर कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीबीआयच्या अटकेनंतर मुंबई हायकोर्टाने चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना न्यायालयीन कोठडीतून सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे. कोचर दाम्पत्याला सीबीआयने केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे असे कोर्टाने सांगितले आहे.

काय आहे प्रकरण? 

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. व्हिडिओकॉन समूहाला ICICI बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर धूत यांनी 2012 मध्ये NuPower Renewables Pvt Ltd (NRPL) मध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. 

आयसीआयसीआयकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दोन नातेवाईकांसह धूत यांनी ही फर्म सुरू केली. अज्ञाताने दिलेल्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. जानेवारी 2019 मध्ये, केंद्रीय CBI ने वेणुगोपाल धूत, चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्यावर गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित कलमांसाठी गुन्हा दाखल केला. फेब्रुवारी 2019 मध्ये, ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT