Mumbai Local Train News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! उद्यापासून १५ डब्यांची लोकल धावणार, वाचा नवीन वेळापत्रक

Mumbai Local Train News: मध्य रेल्वे मार्गावर उद्यापासून १५ डब्यांच्या लोकल धावणार आहेत. अंबरनाथ, कर्जत, बदलापूर आणि कल्याणच्या प्रवाशांना याचा फायदा होईल.

Priya More
  • मध्य रेल्वे मार्गावर २० जुलैपासून १५ डब्यांची लोकल धावणार

  • मध्य रेल्वेमार्गावर १५ डब्यांच्या लोकलचे नवीन वेळापत्रक असणार

  • कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि कर्जतला धावणार १५ डब्यांची लोकल

  • मुंबई लोकल गर्दी कमी करण्यासाठी नवीन निर्णय

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास उद्यापासून म्हणजे २० जुलैपासून गर्दीमुक्त आणि आरामदायी होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांची लोकल धावणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल धावणार असल्यामुळे लोकलमधील गर्दी कमी होईल. परिणामी प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

मुंबईच्या दिशेने नोकरीनिमित्त येणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवासी संख्या वाढत असल्यामुळे लोकलमधील गर्दी देखील वाढत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात, लोकलमधून पडून प्रवासी जखमी होतात किंवा त्यांना जीव गमवावा लागत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी पाऊलं उचलली गेली. लोकलमध्ये अनेक बदल देखील करण्यात आले.

गर्दीमुळे कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथमधील प्रवासी प्रचंड वैतागले होते. इतक्या तासांचा प्रवास गर्दीत आणि तो देखील उभं राहून करणं शक्य होत असल्याने हे प्रवासी १५ डब्यांची लोकल सुरू करण्याची मागण करत होते. अखेर त्यांची मागणी पूर्ण करत रेल्वे प्रशासनाने १५ डब्यांची लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला.

२० जुलैपासून म्हणजे सोमवारपासून मध्य रेल्वे मार्गावर १२ डब्यांच्या १० लोकल १५ डब्यांच्या होणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर यापुढे १५ डब्यांच्या लोकलच्या संख्येत वाढ करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदचे वातावरण आहे. तब्बल ७ वर्षांनंतर मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

१५ डब्यांच्या लोकल सीएसएमटी- अंबरनाथ, सीएसएमटी- कल्याण, सीएसएमटी- बदलापूर आणि सीएसएमटी- कर्जत अशा धावणार आहेत. याचा सर्वाधिक फायदा अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि कल्याणच्या प्रवाशांना सर्वाधिक होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey Trap : खळबळ! भाजप बड्या नेत्याचा तरुणीसोबतचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल; दाम्पत्याने रचला भयंकर कट

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्याअंतर्गत पहिल्या गुन्हाची नोंद

High cholesterol: कोलेस्ट्रॉल कमी करायचंय मग औषधं सोडा; दररोजच्या या 5 सवयींमुळे मेणासारखी वितळेल रक्तवाहिन्यंमधील चरबी

Leg cramps: पायात अचानक क्रॅम्प्स का येतात? ही असू शकतात कारणं

मुंबईत खळबळ! माजी नगरसेविकेच्या मुलाला धक्कादायक प्रकरणात अटक; झडती घेताच पोलिसांचेही डोळे पांढरे

SCROLL FOR NEXT