raj thackeray and uddhav thackeray X
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंच्या युतीच्या चर्चेला वेग? उद्धव ठाकरे अचानक पोहचले राज ठाकरेंच्या शिवतिर्थावर

Raj Thackeray Aand Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत. शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या २० मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Priya More

Summary -

  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे भेट घेतली असून यामुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  • आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती किंवा सहकार्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • गणेशोत्सवानंतर १० दिवसांत ही दुसरी भेट असून, त्यात संजय राऊत आणि अनिल परब सहभागी झाले होते.

  • ठाकरे बंधूंच्या भेटीने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा शिवतीर्थवर गेले आहेत.

गणेशोत्सवामध्ये उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब गेले होते. गणपतीनंतर उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा शिवतीर्थवर आले आहेत. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ते शिवतीर्थवर आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब देखील आहेत. या भेटीदरम्यान बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची चर्चा होत आहे.

याआधी गणेशोत्सवात ठाकरे बंधूंची झालेली भेट ही कौटुंबिक भेट होती. २२ वर्षांनंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. आता १० दिवसांनंतर ते पुन्हा राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ही भेट असल्याचे सांगितले जात आहे.

ठाकरे बंधू एकत्र आले असून दोघेही आता राजकीयदृष्ट्या एकत्रित येणार असल्याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या १५ ते २० मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. या भेटीमुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मोठी बातमी! २६ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

Fish bone in throat: माशाचा काटा घशात अडकला, संसर्ग वाढत गेला आणि अचानक हार्ट अटॅक; डॉक्टरांच्या मेहनतीने रूग्णांचा वाचला जीव

Maharashtra News Live Update: सिव्हिल ड्रेसवरील लोकांकडे पोलिसांकडे काठ्या कशा, उद्धव ठाकरेंचा सवाल

Mumbai Local : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता दर २ मिनिटांनी धावणार लोकल, काय आहे रेल्वेचा नवा प्लान?

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT