Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

सर्वात मोठी बातमी! आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही फुटणार? सूत्रांची माहिती

10 हून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेत फुट सुरूच आहे. शिवसेनेला लागलेली गळती काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता काहीच वेळापूर्वी शिवसेनेचे (Shivsena) चार आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली होती. आता 10 हून अधिक खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता खासदारही फुटत असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी आणखीच वाढल्या आहेत. (Eknath Shinde Latest News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार श्रीरंग बारणे, संजय जाधव, भावना गवळी यांच्यासह जवळपास 10 हून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शिवसेना नेत्यांना भावनिक आवाहन केलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही शिवसेनेत फूट सुरूच आहे. जवळपास 18 पैकी 10 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याने आता उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा सुद्धा या खासदारांमध्ये समावेश असल्याची माहिती आहे. याशिवाय श्रीरंग बारणे, भावना गवळी, संजय जाधव यांच्यासह 10 हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आता शिवसेनेत कोण उरणार? याचीच चर्चा सुरू झाली आहे. कारण सगळेच आमदार खासदार शिंदे गटात सामील होत असल्याचे दिसून येत आहेत.

दरम्यान, शिवसेनेकडे एकूण 55 आमदार होते. या आमदारांमध्ये आपल्याच नेतृत्वाविरोधात खदखद होती. मुख्यमंत्री कुणालाच भेटत नसल्याचा या आमदारांचा दावा होता. त्यामुळे हे आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज होते. विधान परिषद निवडणुकीनंतर हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले.

शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला 13 आमदार होते. नंतर हा आकडा वाढून 22 आणि नंतर 35 झाला. शिंदे यांच्या बंडानंतरही शिवसेनेसोबत काही आमदार होते. गुलाबराव पाटील, सदा सरवणकर, दीपक केसरकर, सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे आमदारही शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेना अधिकच कमकुवत झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेच्या मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

SCROLL FOR NEXT