akola news  Saam tv
मुंबई/पुणे

Akola Politics : बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; पण आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता? नेमकं काय घडलं?

Akola Political News : अकोल्यात बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री झाली आहे. मात्र, पक्षप्रवेशामुळे आमदार अस्वस्थ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Vishal Gangurde

अकोल्यात हरीश अलीम चंदाणी यांची घरवापसी

हरीश अलीम चंदाणी यांच्या प्रवेशाने आमदार रणधीर सावरकर अस्वस्थ झाल्याची चर्चा

या पक्षप्रवेशाने भाजप पक्षात मोठा असंतोष

अक्षय गवळी, साम टीव्ही

भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आणि आमदार रणधीर सावरकर ओळखले जातात, त्यांच्या करारी स्वभावासाठी आणि बाण्यासाठी.... मात्र आज पक्षाच्या अकोला जिल्हा कार्यालयात झालेल्या एका पक्षप्रवेशात त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज स्पष्टपणे दिसत होती. पक्षप्रवेश होता पक्षाचे बंडखोर नेते हरीश अलीम चंदाणी यांच्या घरवापसीचा...

पक्षाच्या प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेतृत्वाने हरीश आलिम चंदानी यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी अकोल्यातील पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला आदेश दिलेत. त्या आदेशाने आलिमचंदानी यांचा पक्षप्रवेश आज पार पडला.

मात्र, अलीमचंदानी यांच्या बंडखोरीमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार विजय अग्रवाल यांचा फक्त 1283 मतांनी पराभव झाला होता. याच निवडणुकीत अलीम चंदानी ज्यांनी अपक्ष म्हणून 22 हजारांच्या जवळपास मतं घेतली होती. या पराभवानंतर पक्षातील सामान्य कार्यकर्ता आजही अस्वस्थ आहे.

या नाराजीच्या पार्श्वभूमीवरही पक्षाला आलिम चंदानी यांची घरवापसी करून घ्यावी लागली. हीच अस्वस्थता आज आमदार रणधीर सावरकर यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीतून स्पष्टपणे जाणवत होता.

भाजपचे बंडखोरांकडून होणार होती नवी आघाडी स्थापन, मात्र...

आज अकोल्यात भाजपाचे बंडखोराचे नेते 'हरीश आलिमचंदानी' यांची भाजपात घर वापसी झालीये. माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या पुतण्याने नाराज भाजप बंडखोरांची मोट बांधली होती. अकोला महापालिकेसाठी भाजपचे सर्व बंडखोर नवी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत होते. मात्र, ऐनवेळी वरिष्ठ पातळीवरून भाजपने मोठा डाव टाकला, अकोल्याच्या भाजप नेतृत्वाला 'हरीश आलिमचंदानी' यांचा पक्ष घडवून आणण्याला भाग पाडले.

आज भाजपचे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थित हा प्रक्ष प्रवेश झालाय. मात्र, अकोल्यातल्या भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा हरीश अलीमचंदाणी यांच्या पक्षप्रवेशावर मोठा विरोध होता. असं असताना अखेर नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी मोजकेच तास शिल्लक राहिलेये. अशावेळी आज अलीमचंदाणी यांची पक्षात घर वापसी झाली. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाने भाजप पक्षात मोठा असंतोष पसरल्याचे चित्र आहे.

हरीश अलिमचंदानी नेमके कोण..?

हरीश अलिमचंदानी यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी वंचितने त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनी 21000 मतं घेतली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेल्या विजय अग्रवाल यांचा फक्त 1283 मतांनी पराभव झाला होता.‌ विजय अग्रवाल हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर आहेत.

आज त्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशात जाणं टाळले खरी, मात्र अग्रवाल यांची मोठी नाराजी दिसून आली. दरम्यान, भाजपच्या उमेदवाराच्या पराभवसाठी कारणीभूत ठरलेल्या अलीमचंदानी यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजप पक्षातील नेमकं काय समीकरण बदलतात, हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील अनेक शाळांना आज सुट्टी

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार, शेलार-साटम अन् शेवाळे राजधानीत, शिंदेंच्या मनात नेमकं काय?

SIP Calculator: दररोज फक्त १०० रुपये गुंतवा अन् ४ कोटी मिळवा; SIPचं कॅल्क्युलेशन वाचा

First step if phone hacked: तुमचा फोन हॅक झाला तर पहिली गोष्ट कोणती करावी? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! मंत्री आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT