Pimpri Chinchwad Political News Saam
मुंबई/पुणे

पुण्यात ठाकरे गटाला धक्का? बडा नेता अजित पवारांसोबत जाणार? नेत्याची पत्नी दादांना भेटणार

Pimpri Chinchwad Political News: महापालिका निवडणुकापूर्वी ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता. संजोग वाघेरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा.

Bhagyashree Kamble

  • पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पक्षांतराच्या चर्चेत.

  • वाघेरेंची पत्नी अजित दादांना भेटणार.

  • गणेशोत्सवानिमित्त पार्थ पवार अन् वाघेरेंची भेट.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक नेत्याने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. सध्या बड्या नेत्यांकडून पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्यात येत आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये लवकरच शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमधील बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महापालिका निवडणुकाआधी पिंपरी चिंचवडमधील बालेकिल्ला काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे.

आज अजित पवार शहरात आहेत. याच प्रसंगी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे अजित दादांना भेटणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यात चर्चा होणार आहे. त्यामुळे संजोग वाघेरे मशाल सोडून अजित पवार गटात जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. 'मी मुळात शिवसेनेत असलो तरी, माझी पत्नी आजही राष्ट्रवादीतच आहे. मी तूर्त तरी शिवसेनेत आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर पाहुयात', असं ते म्हणाले

काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी संजोग वाघेरे यांची निवासस्थानी भेट घेतली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही सदिच्छा भेट असल्याचं ते म्हणाले. मात्र, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. जर या चर्चा खऱ्या ठरल्या तर, पिंपरी चिंचवडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला जोरदार धक्का बसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP नेत्याला शिवीगाळ अन् कानशिलात लगावली; कार्यकर्त्यांचा ठिय्या, पोलीस इन्स्पेक्टर निलंबित

एका दिवसात किती संत्री खाऊ शकतो?

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये ओढ्याला आलेल्या पुरात २ जण वाहून गेले,एकाचा मृत्यू

Zubeen Garg: जुबिन गर्ग यांची शेवटची इच्छा चाहत्यांनी केली पूर्ण, VIDEO व्हायरल

वारंवार होणाऱ्या अ‍ॅसिडीटीमुळे पोटोचा कॅन्सर होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT