Mumbai Railway Ticket Booking: आयआरसीटीसीची वेबसाईट (IRCTC Website) तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. गेल्या १६ तासांपासून आयआरसीटीसीची वेबसाईट आणि ॲप दोन्ही बंद आहेत. रेल्वे तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) होत नसल्यामुळे रेल्वे स्थानकांवरील तिकीट काऊंटरवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची भली मोठी रांग लागली आहे. ही गर्दी लक्षात घेता रेल्वेने अतिरिक्त काऊंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विभागामध्ये विविध स्थानकात १३ काऊंटर (PRS Window Counter) सुरु करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकिंग करता येत नसल्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटवर प्रवाशांनी तिकीट काढण्यासाठी मोठी रांग लागवली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांची समस्या लक्षात घेऊन मुंबई विभागातील स्थानकांवर अतिरिक्त PRS विंडो काऊंटर उघडले आहेत.
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ५ PRS विंडो काऊंटर उघडण्यात आले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकावर २, वर्तकनगर येथे १, भायखळा रेल्वे स्थानकावर १, वाशी रेल्वे स्थानकावर १, मुलुंड रेल्वे स्थानकावर १, बदलापूर रेल्वे स्थानकावर १, चेंबूर रेल्वे स्थानकावर १ असे एकूण १३ PRS विंडो काऊंटर सुरु करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
आयआरसीटीसीची वेबसाईट तांत्रिक कारणांमुळे बंद असल्यामुळे रेल्वे तिकीट बुकिंसाठी पेमेंट करता येत नाही. पेमेंट झाले तर पैसे कट होत असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रवाशांकडून आल्या आहेत. ही सेवा अचानक बंद पडल्यामुळे देशभरातील लाखो रेल्वे प्रवाशांना तिकीट बुक करताना समस्या येत आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. ही वेबसाईट कशामुळे बंद आहे यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आयआरसीटीसीने प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी काही पर्याय दिले आहेत. तिकीट बुकिंगसाठी तुम्ही आस्क दिशा (Ask Disha ) पर्याय निवडू शकता. तुमच्या आयआरसीटीसी ई-वॉलेटमध्ये पैसे असतील तर तिथून तिकीट बुकिंग करु शकता. याशिवाय, तुम्ही रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून तिकीट बुक करू शकता. त्याचसोबत, पर्यायाने Amazon, Makemytrip इत्यादी इतर B2C प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला तिकीट बुक करता येईल, असे आयआरसीटीसीने सांगितले आहे. तसंच ही तांत्रिक अडचण सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तांत्रिक अडचण दूर होताच माहिती दिली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.