कात्रज चौकातील वाहतूकीत उड्डाणपुलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. वाहतूकीचा प्रचंड दबाव असल्याने कात्रज चौकामधील उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉचिंगचे काम अडकलेले आहे. यापूर्वी एकदा ते करण्यास सुरुवात केली. त्यावेळी येथील वाहतूकीत बदल केल्याने अभुतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे हे काम सातत्याने पुढे ढकलले जात होते. आता वाहतूकीचे नियोजन वाहतूक शाखेने केले असून ३ डिसेंबरपासून हे काम सुरु होणार आहे. त्यामुळे या चौकात येणार्या रस्त्यावरील वाहतूकीत मोठे बदल करण्यात येत आहे. हे बदल ३ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहेत.
कात्रज चौकात जड/अवजड वाहने (डंपर, हायवा, मिक्सर, हेवी मोटर व्हेईकल्स, हेवी गुड्स मोटार व्हेईकल्स, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल, ट्रेलर्स, कंटेनर्स, मल्टी अॅक्सल वाहने) अशा वाहनांना बंदी असणार आहे. साताऱ्याकडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पुलापासून आणि नविन बोगद्यामार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवलेपुल येथे आणि मुंबईकडून वारजेमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवलेपूल येथे प्रवेश बंद राहणार आहे.
सोलापुरकडून हडपसरमंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे, सासवडकडून मंतरवाडीमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे, बोपदेव घाटाकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडीमशिन चौकापुढे, मार्केटयार्ड, गंगाधाम बिबवेवाडीमार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे प्रवेश बंद राहील.
सातारा रस्त्यावरून स्वारगेटकडून कात्रजमार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहील. त्याचबरोबर, मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री १० वाजल्यापासून सकाळी ४ वाजेपर्यंत प्रवेश चालू ठेवण्यात येणार आहे. मात्र, त्यांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंद राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.