Smita Thackeray Meet CM Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! आता ठाकरे घराण्यातही फूट?; स्मिता ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

आता स्मिता ठाकरेही शिंदे गटात जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली. सुरूवातीला आमदार, त्यानंतर खासदार आणि आता थेट नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. दरम्यान, एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत असतानाच, दुसरीकडे स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता स्मिता ठाकरेही शिंदे गटात जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. (Smita Thackeray Meet CM Eknath Shinde)

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि अनेक नगरसेवक तसेच पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत आहे.

उद्धव ठाकरे हे शिवसेनाभवात बैठकी घेत आहेत. तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात निष्ठा यात्रा काढली आहे. मात्र असं असलं तरी, उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. त्यातच आता स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आता ठाकरे घराण्यातही फूट पडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. (CM Eknath Shinde Latest News)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या चर्चेवर स्मिता ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे जुने शिवसैनिक आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठी आले होते. असं स्मिता ठाकरे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याबाबत त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात काँग्रेसला नवा चेहरा मिळाला, ऐन निवडणुकीत शरद पवारांना धक्का

Saturday Horoscope: भावनेच्या भरात नुकसान होईल, ४ राशींना मिळेल कर्माचे फळ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: - शिवसेना भाजप यांची जवळपास 210 जागेवर एकमत झाल्याचे माहिती

Ajit Pawar News : अजित पवार गटात नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार?

Dog Behavior: ठराविक लोकांना बघुनच कुत्रे का भुंकतात?

SCROLL FOR NEXT