Shivsena Ex Corporator Yogesh Bhoir Arrested Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena : ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याला खंडणीच्या आरोपाखाली अटक, शिवसैनिक आक्रमक

भोईर यांच्याविरुद्ध समता नगर पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाकडून काही दिवसांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही

Shivsena Ex Corporator Yogesh Bhoir Arrested : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray)  माजी नगरसेवक योगेश भोईर यांना क्राइम ब्रांच युनिट 11 ने अटक केली आहे. खंडणी आणि सावकारी कायद्यानुसार योगेश भोईर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. हा ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

योगेश भोईर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कांदिवली भागातील उपविभाग प्रमुख असून ते माजी नगरसेवक देखील आहेत यापूर्वी त्यांच्यावर समता नगर पोलीस ठाण्यामध्ये विकासकांकडून 2 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

मंगळवारी (27 डिसेंबर) त्यांना या प्रकरणी जामीन देखील मंजूर झाला होता. परंतू एका जुन्या गुन्ह्यातील प्रकरणाचा गुन्हा क्राईम ब्रँच 11 कडे दाखल होता. तब्बल चार तास चौकशी करण्यात आल्यानंतर अखेरीस रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास योगेश भोईर यांना अटक करण्यात आली आहे.   (Maharashtra Political News)

दरम्यान, माजी नगरसेवक योगेश भोईर यांना क्राइम ब्रांच युनिट 11 ने अटक करताच, याविरोधात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी क्राईम ब्रँच युनिट बाहेर जोरदार घोषणाबाजी करत विरोध दर्शवला.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रात्री योगेश भोईर यांना साउथ मुंबईतील क्राइम ब्रांच कार्यालयात हलवण्यात आले. उद्या त्यांना 11 वाजता किल्ला कोर्टात हजर करण्यात येईल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जातेय; निवडणूक आयोगाकडून पहिली प्रतिक्रिया

Rising health problems: भारतात येत्या काळात १० पैकी ३ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब त्रास; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

Double Gratuity: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार डबल ग्रॅच्युटी; वाचा NPS चा नियम काय सांगतो

Municipal Elections Voting Live updates : उमेदवाराची पोलिसांसोबत बाचाबाची

Shocking: बायकोचं अनैतिक संबंध, पाठलाग करत नवरा हॉटेलवर पोहचला, बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं

SCROLL FOR NEXT