Maharashtra Political News : शिंदे गटाचे ४ मंत्री अडचणीत कसे आले? सुषमा अंधारेंनी सांगितलं भाजपचं 'राज'कारण

शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांना अडचणीत आणण्यामागे भाजप आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी यावेळी केला.
Sushma Andhare
Sushma AndhareSaam Tv
Published On

Sushma Andhare News : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सुषमा अंधारे यांनी दौऱ्यात पत्रकार परिषदेत घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. सध्या शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांवर विरोधकांकडून घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे. शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांना अडचणीत आणण्यामागे भाजपच आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी यावेळी केला. (Latest Marathi News)

Sushma Andhare
Ajit Pawar : 'देवेंद्र फडणवीसांना साडे चार वर्ष मुख्यमंत्री राहून...'; अजित पवारांचा अधिवेशनात गौफ्यस्फोट

सुषमा अंधारे पत्रकार परिषदेत म्हणाल्या, 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिळ्या कढीला ऊत आणू नये. सुषमा अंधारे पेड कार्यक्रम करते. पण राज्य सरकारला विचारलेले प्रश्न चुकीचे आहेत का,असा सवाल त्यांनी केला.

'सुषमा अंधारेंनी सांगितलेले १५ नावे चुकीचे आहेत का, भाजपने त्यांना क्लीन चीट दिली आहे. भाजप दोन एकनाथांना न्याय देताना फरक करत आहेत. एकनाथ खडसे यांना वेगळा न्याय आणि एकनाथ शिंदे यांना वेगळा न्याय याच्यावर काही बोलत नाही', असेही त्या म्हणाल्या.

Sushma Andhare
Uddhav Thackeray : 'भाजपमध्ये चंपी मालीश होते'; उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

'राज्यातील महापुरुषांच्या ग्रंथसंपदा खोटे आहेत असे सांगून फडणवीस जाळून टाकतील का ते सांगावे, आज चार मंत्री अनेक प्रकरणांमध्ये अडचणीत आले आहेत. हे चारही मंत्री शिंदे गटातील आहेत. भाजप पद्धतशीरपणे शिंदे यांना अडचणीत आहेत. शिंदे यांच्या मंत्र्यांना अडचणीत आणत आहेत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

'भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले होते, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्याच पद्धतीने पद्धतशीरपणे कटकारस्थान करून पूर्णत्वास नेले जात आहे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. सुषमा अंधारे यांच्या या दाव्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रत्युत्तर येईल, ते पाहावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com